esakal | अखेर पणन महासंघाला सापडला खरेदीचा मुहूर्त, पाच जिनिंगवर कापूस खरेदी सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

cotton selling center of panan mahasangh starts in yavatmal

यंदा दिवाळीनंतर जिल्ह्यात पणन महासघांच्या कापूस खरेदी केंद्रांना मुहूर्त सापडला आहे. परिणामी, गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय कापूस खरेदी केंद्र उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

अखेर पणन महासंघाला सापडला खरेदीचा मुहूर्त, पाच जिनिंगवर कापूस खरेदी सुरू

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यातील तीन केंद्रांतील पाच जिनिंगवर शुक्रवारपासून (ता.27) 'पणन'च्या कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरण असल्याने आवक कमी होती. पहिल्या दिवशी तीनही केंद्रांवर 30 वाहनांच्यावर नोंदणी झाली असून, 'पणन'च्या कापूस खरेदीला मुहुर्त सापडला आहे.

हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण

यंदा दिवाळीनंतर जिल्ह्यात पणन महासघांच्या कापूस खरेदी केंद्रांना मुहूर्त सापडला आहे. परिणामी, गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय कापूस खरेदी केंद्र उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. जिल्ह्यात पहिल्या दिवशी तीन केंद्रांतील पाच जिनिंग सुरू करण्यात आल्या आहेत. ढगाळ वातावरण असतानाही पहिल्या दिवशी केंद्रांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला. प्रत्येक जिनिंगवर 50च्यावर वाहने होती. कापूस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हुकमी पीक आहे. यंदा जिल्ह्यात यवतमाळ, कळंब व आर्णी हे तीनच केंद्र सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 20 हजार 328 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे.

हेही वाचा - चांदूर बाजार नगरपालिकेची पोटनिवडणूक, भाजपचा पराभव करत पालिकेवर प्रहारचा झेंडा

पणन महासंघाकडून पाच हजार 825 रुपये हमीभाव दिला जाणार आहे. खासगी बाजारात शासकीय केंद्रांच्या तुलनेत बराबरीचे दर आहेत. परिणामी, शासकीय व खासगी अशा दोन्हीकडे कापसाची आवक वाढली आहे. येत्या काही दिवसांत कापसाचे दर वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच कापसाची आवक मंदावली आहे. असे असले तरी कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येण्याची शक्‍यता आहे. यवतमाळ केंद्रावर कापूस खरेदीची सुरुवात करताना 'पणन'चे संचालक सुरेश चिंचोळकर, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, पणनचे व्यवस्थापक चक्रधर गोस्वामी, उपव्यवस्थापक डी. जी. गायनर यांच्यासह शेतकरी व जिनिंगचालक उपस्थित होते.

हेही वाचा - अमरावती मुख्यालयातील सहाय्यक आयुक्तपद रद्द, मनपात शीतयुद्ध पेटण्याची शक्यता

बोंडअळीने गुणवत्तेवर परिणाम -
जिल्ह्यात यंदा बोंडअळीने कापूस पीक फस्त केले आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांनी घरात आलेला कापूस विक्रीसाठी बाहेर काढला आहे. मात्र, पहिल्या वेचातही बोंडअळीचा परिणाम दिसून येत आहे. गाठीत पिवळा व लालमार्कीग येत आहे. त्यामुळे कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम झालेला दिसत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.

loading image