सरपंचपदाचे काउंडाऊन सुरू; सदस्य लागलेत कामाला; काही तासच शिल्लक

सुधीर भारती
Monday, 1 February 2021

दोन किंवा तीन गावे मिळून तयार झालेल्या गटग्रामपंचायतींमध्ये या पदासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सरपंचपद आपल्याच गावाकडे राहावे, यासाठी आतापासूनच पॅनेलची मंडळी कामाला लागली आहे.

अमरावती : ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती सरपंचपदाची. दोन व चार फेब्रुवारीला सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असली तरी सरपंचपद आपल्याच गावात राहावे, यासाठी गटग्रामपंचायतींचे सदस्य कामाला लागले आहेत. अनेकांनी संभाव्य आरक्षणाचे ठोकताळे मांडून आपले गणित बसविण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील ५२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सरपंचपदाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आरक्षणानंतरच सरपंचपदाचे चित्र स्पष्ट होणार असले तरी संभाव्य ठोकताळे आखण्यात येत आहे.

अधिक वाचा - गडकरींशी पंगा नको म्हणून आमदार पडळकरांना भाजप नेत्यांनी सोडले वाऱ्यावर; अद्याप ‘वंचितच'

दोन किंवा तीन गावे मिळून तयार झालेल्या गटग्रामपंचायतींमध्ये या पदासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सरपंचपद आपल्याच गावाकडे राहावे, यासाठी आतापासूनच पॅनेलची मंडळी कामाला लागली आहे. ५२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असून आता सर्वांनाच सरपंचपदाचे वेध लागले आहे.

संभाव्य उमेदवार सज्ज

सरपंचपदाचे आरक्षण महिला राखीव निघाल्यास वेळेवर धावपळ होऊ नये यासाठी पॅनेल्सकडून संभाव्य महिला उमेदवारांची नावे फायनल करण्यात येत आहे. याशिवाय संवर्गनिहाय सुद्धा संभाव्य उमेदवार सज्ज झाले आहेत.

अधिक माहितीसाठी - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

या तालुक्‍यांत होणार सोडत

  • २ फेब्रुवारी ः अमरावती, तिवसा, मोर्शी, दर्यापूर, चांदूरबाजार, धारणी
  • ४ फेब्रुवारी ः नांदगाव खंडेश्‍वर, भातकुली, धामणगावरेल्वे, वरूड, अंजनगावसुर्जी, अचलपूर, चिखलदरा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The countdown to the post of Sarpanch begins Members started working