आठ दिवसांत प्रेम अन्‌ पळून केले लग्न; तरीही पोलिसांनी लावला विवाह, मग...

couple got stuck in separation after getting married
couple got stuck in separation after getting married

व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) : लॉकडाउन सुरू असल्यामुळे दोन कुटुंबातील मुलगा आणि मुलगी आई-वडिलांकडे राहायला आहे. दोघांचेही घर शेजारीच. त्यामुळे दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. आठ दिवसांतच त्यांच्यात प्रेम झाले. दोघांनीही घरच्यांना लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र, विरोध झाल्याने पळून लग्न केले. पोलिसांनी त्यांना शोधून काढले अन्‌ पुढील प्रकार घडला... 

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका. येथील कोंडखेल येथील विटाभट्टीत सिद्धार्थ रामटेके व गुरूदेव सहारे हे कामगार. दोघेही कामगार आपल्या कुटुंबासह तिथेच झोपडी बांधून राहतात. देशात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे रामटेके यांची मुलगी माया व सहारे यांचा मुलगा पवन आई-वडिलांकडे राहायला आले. दोघांच्याही झोपड्या शेजारीच. त्यामुळे माया आणि पवनची ओळखी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आठ दिवसांतच प्रेम झाले आणि लग्न करण्याचे ठरवले.

मायाने आई-वडिलांना पवनसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र, आई-वडिलांनी त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला. परंतु, प्रेमात बुडालेली माया काहीही ऐकाला तयार नाही. त्यामुळे रामटेके यांनी मुलीला मावशीच्या घरी नेऊन सोडले. परंतु, दोघांमध्ये मोबाईलवरून संवाद सुरूच होता. अशातच त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्धार केला. दोघेही पळून गेले. 

वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार बेंबाळ पोलिस उपकेंद्रात दाखल केली. पोलिसांनी लागलीच शोध सुरू केला. तपासात पवन आणि माया गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बेंबाळ पोलिसांनी आरमोरी ठाणेदारांशी संपर्क केला. आरमोरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. आम्ही वयस्क असून, लग्न केल्याची माहिती माया व पवन यांनी पोलिसांनी दिली. तरीही पोलिसांनी त्यांचे पुन्हा लग्न लावून दिले.

दोघेही विलगीकरणात

टाळेबंदीत दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्यांचे संस्थात्मक विलगीकरण करा, असे सरकारचे निर्देश आहे. दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आले होते. त्यामुळे तिथे त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. सध्या ते दोघेही आरमोरी येथील विलगीकरण केंद्रात आहे. 

वैवाहिक जीवन लॉकडाउन

टाळेबंदी आणि सीमाबंद असतानाही प्रेमीयुगुला पळून गेले. तिथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघेही वयस्क असल्याने त्यांचा विवाह ठाणेदारांनी लावून दिला. मात्र, दुसऱ्या जिल्ह्यातून आल्याने त्यांचे तिथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे सध्यातरी त्यांच्या वैवाहिक जीवनाचे लॉकडाउन झाले आहे. विशेष म्हणजे त्यांचे प्रेमसबंध जुळून केवळ आठ दिवस झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com