Washim News : शेतकऱ्याला योग्य मोबदला द्या! कोर्टानं टोल नाकाच केला जप्त; NHAIला दणका, दररोज २-३ लाखांची होते वसुली

Farmer compensation case against NHAI: जिल्हा न्यायाधीशांचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांच्या कोट्यवधींच्या भरपाईसाठी टोल प्लाझा जप्तीचा इशारा, NHAIच्या उद्दामपणाला लगाम
Toll Plaza Attached After Compensation Dispute; Court Acts Against NHAI

Toll Plaza Attached After Compensation Dispute; Court Acts Against NHAI

sakal

Updated on

वाशीम : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जमिनीची योग्य किंमत दिली नसल्याने न्यायालयात धाव घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी वाशीमचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी चक्क टोल नाकाच जप्त करण्याचा आदेश दिल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वाशीम-रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील जांभरूण नावजी गावातून येथील बेबीताई गर्जे आणि त्यांचा मुलगा विठ्ठल यांची जमीन वाशीम बायपाससाठी घेण्यात आली. गैरकृषी असलेल्या या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com