धक्कादायक! वाहतूक शिपायाच्या अंगावर ट्रक चढवण्याचा प्रयत्न; भोपाळहून हैदराबादला गोवंश तस्करी 

cow smugglers tried to attack on traffic controller in Chandrapur
cow smugglers tried to attack on traffic controller in Chandrapur

चंद्रपूर: वाहतूक शिपायाच्या अंगावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न करून चालकाने पळ काढला. त्यानंतर काही युवकांनी वाहतूक शिपायासह पाठलाग करून ट्रक पकडला. ट्रकची तपासणी केली असता गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस आला. ही कारवाई मंगळवारी (ता. 16) दुपारच्या सुमारास करण्यात आली. ट्रकचालकाला अटक करून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शाहीद खान रशीद खान (रा. भोपाळ) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील जनता कॉलेज चौकात सिग्नलवर वाहतूक शिपाई कर्तव्यावर होता. आरजे 11 जीए 6340 क्रमांकाचा भरधाव वेगाने येणारा ट्रक सिग्नल तोडून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे वाहतूक शिपायाने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालकाने ट्रक अंगावर चढविण्याचा प्रयत्न करीत तेथून पळ काढला. यावेळी चौकात उपस्थित प्रशांत भारती, इरफान शेख, अमोल चवरे, बबलू कुरेशी हे युवक हा सर्व प्रकार बघत होते.

त्यानंतर या चारही युवकांनी वाहतूक शिपायाला सोबत घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केला. सिद्धार्थ हॉटेलजवळ ट्रकच्या समोर वाहने उभी करून अडविला. त्यानंतर वाहतूक शिपायाने ट्रकमध्ये चौकशी केली असता तेथे गोवंश आढळून आले. त्यामुळे या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. 

पोलिसांनी ट्रकचालकाला अटक करून गुन्हा दाखल केला. सर्व गोवंश लोहारा येथे पाठविल्या. भोपाळ येथून हैदराबाद येथे गोवंश तस्करी केली जात असल्याची माहिती चालकाने यावेळी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com