esakal | रात्रंदिवस राबून जोपासलं पीक अन् पशूधन, पण एक ठिणगी पडली अन् सर्वच संपलं
sakal

बोलून बातमी शोधा

crop and cattle caught fire in hinganghat of wardha

नायब तहसीलदार समशेर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार,  येथील लक्ष्मिकांत पंढरीनाथ देवतळे यांचे ६.४३ हेक्टर आर. शेतात जनावर, शेतमाल व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी गोठा बांधलेला आहे.

रात्रंदिवस राबून जोपासलं पीक अन् पशूधन, पण एक ठिणगी पडली अन् सर्वच संपलं

sakal_logo
By
रूपेश खैरी

हिंगणघाट (जि. वर्धा) : रात्रंदिवस राबराब राबून पीक आणि पशूधन वाढवलं. पण, आयुष्यभर कमावलेली ही जमापुंजी आगीत अचानक भस्म झाली. शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेमुळे त्याला मोठा धक्का बसला आहे. वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्यातील काजळसरा येथे गोठ्याला आग लागून गुराढोरांसह संपूर्ण शेतमाल जळून खाक झाला आहे. यामध्ये जवळपास सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा - ‘तू मला नाही तर, मी तुला नाही’; तीन बाय सहा इंच डिस्प्लेने तरुणांना ग्रासले

नायब तहसीलदार समशेर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार,  येथील लक्ष्मिकांत पंढरीनाथ देवतळे यांचे ६.४३ हेक्टर आर. शेतात जनावर, शेतमाल व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी गोठा बांधलेला आहे. या गोठ्याला २८ फेब्रुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागून या आगीत तिन बैल, दोन गायी, एक कुत्रा पूर्णपणे जळून मृत्युमुखी पडले. तसेच ६० कोंबड्या जळून खाक झाल्या. एक बैल ९० टक्के जळाला असून गोठ्यातील दहा पोते हळद, पाच पोते सोयाबीन, दहा पोते युरीया, विस गोणी कुटार व शेतीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य पूर्णपणे जळाले. यात कोणतीही मनुष्यहानी झालेली नसून आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.

हेही वाचा - मुलींची निर्वस्त्र पूजा प्रकरण : भोंदूबाबाकडे सापडले शेकडो मुलींचे फोटो; लैंगिक...

चण्याच्या गंजीला लावली आग, शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान 

सेलू पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या घोराड येथील मौजा कोलगाव शिवारातील हरिभाऊ लक्ष्मण तेलरांधे यांनी त्यांच्या शेतात लावून ठेवलेल्या चण्याच्या गंजीला अज्ञात व्यक्‍तीने आग लावली. यात त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी (ता. 28) रात्रीच्या सुमारास घडली. 

हेही वाचा - शिवसेनेकडे नाहीत फारसे पर्याय; आशीष जयस्वाल नवे वनमंत्री?

शेतकरी हरिभाऊ तेलरांधे यांच्याकडे तीन एक शेती आहे. त्यांना पूर्वी सोयाबीन पिकामध्ये नापिकी झाली होती. चण्याच्या उत्पन्नामध्ये नुकसान भरपाई भरून निघेल या आशेने शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतात चण्याचा पेरा केला. शनिवारी दिवसभर मजुरांच्या हाताने कापणी करून शेतामध्येच ढीग लावला. सोमवारला मळणी यंत्र सांगून चण्याचे पीक काढायला सुरुवात होणार होती. परंतु, रविवारी मध्यरात्रीलाच अज्ञात व्यक्‍तीकडून चण्याच्या गंजीला आग लावण्यात आली. यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन कंगाले, नंदकिशोर हटवार करीत आहे.
संबंधित प्रकरणांमध्ये काही संशयित व्यक्तींचा तपास सुरू आहे. मुख्य आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.
- गजानन कंगाले, पोलिस उपनिरीक्षक, सेलू 

loading image