यवतमाळ जिल्ह्यातील पीकपरिस्थिती चिंताजनक; सुधारीत पैसेवारी 54 

चेतन देशमुख 
Saturday, 31 October 2020

गेल्यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्यावर्षी नजरअंदाज पैसेवारी ६० च्यावर होती. मात्र, अंतिम पैसेवारीत सुधारणा झाली. यंदाही जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत पावसाचा फटका पिकांना बसला.

यवतमाळ : नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील पीकपरिस्थिती उत्तम असल्याचे समोर आले होते. मात्र, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्‍टोबर या पाच महिन्यांत पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता सुधारित पैसेवारीत मोठा बदल झाला आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६५ आली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले होते. आता सुधारित पैसेवारी ५४ आल्याने शेतकऱ्यांना अंतिममध्ये दिलासा मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

गेल्यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्यावर्षी नजरअंदाज पैसेवारी ६० च्यावर होती. मात्र, अंतिम पैसेवारीत सुधारणा झाली. यंदाही जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत पावसाचा फटका पिकांना बसला. असे असले तरी नजरअंदाज पैसेवारी ६५ निघाल्याने पीकपरिस्थिती उत्तम असल्याचे प्रशासनाच्या लेखी दिसत होते.

त्यानंतर ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे सुधारित पैसेवारीत त्यांचा अंतर्भाव दिसून आला. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. कापसाचेही प्रचंड नुकसान केले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. सुधारित पैसेवारी ५४ आल्याने शेतकऱ्यांना आता अंतिम पैसेवारीतून दिलासा मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

अंतिम पैसेवारी बाकी असल्याने त्यात बदल होण्याची शक्‍यता आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने पिकांना फटका बसला. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पीककाढणीच्या वेळी परतीच्या पावसाने पीक अडचणीत आले. सप्टेंबर महिन्यातील पावसाने लवकर पेरणी केलेल्या पिकांना मोठा फटका बसला. परिणामी सोयाबीनच्या उत्पादनात घट आली आहे. अशातच जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६५ आल्याने शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. सुधारित पैसेवारीत मोठा बदल दिसून येत आहे. नजरअंदाजच्या तुलनेत सुधारीतमध्ये घट झालेली आहे. सुधारित पैसेवारीवरच बहुतांशवेळी अंतिम पैसेवारी असते. त्यात फारसा बदल होत नाही. असे झाल्यास शेतकरी अडचणीत सापडण्याची दाट शक्‍यता आहे. 

ठळक बातमी - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाची पडलीय 'भूल'?

जिल्ह्यात २१५९ गावे आहेत. त्यात लागवडीसाठी योग्य असलेल्या गावांची संख्या २०४६ आहे. या सर्व गावांची पैसेवारी जाहीर झालेली आहे. जिल्ह्याची सुधारित सरासरी ५४ पैसेवारी आली आहे. आता येत्या ३१ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर होणार असल्याने त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

अधिक माहितीसाठी - नागपूर विद्यापीठ प्रशासन म्हणतेय, ऑनलाईन परीक्षेत राज्यात आम्हीच अव्वल

तालुका-   नजरअंदाज-  सुधारीत पैसेवारी 

यवतमाळ-     ६५-          ५३ 
कळंब-          ६७-          ५६ 
बाभूळगाव-     ६८-          ५४ 
आर्णी-            ६२-          ५२ 
दारव्हा-          ६४-           ५३ 
दिग्रस-           ६५-           ५३ 
नेर-               ६३-            ५४ 
पुसद-            ६५-           ५० 
उमरखेड-      ६७-           ५३ 
महागाव-       ६२-            ५२ 
केळापूर-       ६४-           ५५ 
घाटंजी-         ६५-           ५४ 
राळेगाव-       ६६-           ५९ 
वणी-            ६७-          ५७ 
मारेगाव-        ६५-          ५४ 
झरी जामणी-   ६३-          ५३ 
........................... 
संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop situation in Yavatmal district is critical; Revised Pay Percentage 54