Phased Relaxation : अमरावतीत आजपासून संचारबंदी अशी होणार शिथिल; हे आहेत नियम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Public Curfew

अमरावतीत आजपासून संचारबंदी अशी होणार शिथिल; हे आहेत नियम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सात दिवसांपूर्वी शहरात बंद दरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्या टप्प्याने शिथिलता देण्यात आली. शुक्रवारी (ता. १९) दोन टप्प्यात प्रत्येकी तीन-तीन तासांसाठी संचारबंदीत शिथिलता देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे, असे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी गुरुवारी (ता. १८) जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

शिथिलता कालावधीत बियाणे विक्री, कृषी केंद्र तसेच किराणा, डेअरी अशी जीवनावश्यक वस्तू विक्रीचे दुकाने सुरू राहतील. तर बँकांसह इतर शासकीय कार्यालये विहित वेळेत नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे. गुरुवारी (ता. १८) सकाळी ११ ते सायंकाळी पाच अशी सरसकट सहा तास संचारबंदीत शिथिलता देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली.

हेही वाचा: ‘दंगल पूर्वनियोजित कशी हे सिद्ध करा अन्यथा तुमचाही कुठेतरी हात’

शिथिलतेच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सामान्य होती. संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला. संचारबंदीची वेळ संपल्यानंतर पुन्हा ठिकठिकाणी बॅरिकेट लावून वाहनचालकांची चौकशी आणि तपासणीचे सत्र सुरू करण्यात आले. पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलिस दलाचे जवान सुद्धा तैनात दिसले.

कोतवालीत बंदद्वार बैठक

पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, उपायुक्त विक्रम साळी, साहाय्यक पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत शहर कोतवाली ठाण्यात निरीक्षकांच्या कक्षात बंदद्वार बैठक झाली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जाते.

हेही वाचा: जिला मुलगी म्हटले तिलाच केले गर्भवती; शेजाऱ्याचे कृत्य आले समोर

इंटरनेट सुरू होण्याचे संकेत

शहरातील इंटरनेट सेवा शुक्रवारी (ता. १९) दुपारी ३ वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. ही सेवा शुक्रवारी (ता. १९) दुपारी तीननंतर सुरू होण्याचे संकेत प्रशासनाकडूनच देण्यात आले आहे.

दस्तऐवज पोलिसांना दाखविणे आवश्यक

शिथिलता सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत राहील. त्यानंतर पुन्हा दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहील. दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुन्हा तीन तास संचारबंदी शिथिल राहील. यावेळेत परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासह इतर कामासाठी संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. परंतु त्यासाठी आवश्यक ते दस्तऐवज पोलिसांना दाखविणे आवश्यक राहील, असे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.

loading image
go to top