COVID19 : मुंबई, पुणे, नाशिक सारख्या महानगरांतून आलेल्या नागरिकांमुळे धोका वाढतोय; या विषयाकडेही करताय दुर्लक्ष

corona test in sangrampur.jpg
corona test in sangrampur.jpg

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : तालुक्यात काही नाही असे समजून महानगरातून खेड्यात आलेले नागरिक खुलेआम फिरत आहेत. स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्षितपणा आणि हलगर्जीपणामुळे बंदी असताना काही दुकाने सुरू आहेत. यामुळे गर्दी होत आहे. यातच टूनकी येथे 23 मेच्या रात्री मुंबई (धारावी) येथून आलेला एकजण कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. तर 24 मे रोजी संग्रामपूर शहरातील एका तरुणाला शेगाव येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या माहितीला तालुका आरोग्य विभागाकडून दुजोरा मिळाला आहे. 

संग्रामपूर तालुक्यातून नोकरी, व्यवसाय व रोजगारानिमित्त बाहेर गेलेले या तालुक्यात शेकडोंच्या संख्येने नागरिक कुटुंबासह परतले आहेत. यातील काहींनी क्वारंटाइन करून घेतले असतानाही बाहेर फिरतांना दिसत आहेत व येणाऱ्यांची संख्याही वाढतच आहे. त्यामुळे कोरोना संसर्गजन्य रोग होण्याची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात बाहेर गावावरुन आलेल्या व येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

काही ठिकाणी लक्ष दिल्या जाते तर काही ठिकाणी गावातले संबंध म्हणून व नातेवाईक म्हणून दुर्लक्ष केल्या जात आहे. खेड्यात असणाऱ्या ग्रामीण भागातील तसेच संग्रामपूर शहरातील अनेक नागरिक, युवक पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सुरत आदी शहरामध्ये नोकरी, व्यवसाय, रोजगारासाठी गेले होते. परंतु कोरोनाने थैमान घातल्याने व त्याची लागण झाल्याने भीतीपोटी शेकडोंच्या संख्येने आपल्या मुळगावी खेड्यात आले आहेत. याबाबत काही ठिकाणी स्थानिक पदाधिकारी व प्रशासन देखील दिवसेंदिवस कोरोनाबाबतीत उदासिन होत असताना दिसत आहे.

आता तर शासनाने थोडी शिथीलता व ढिल दिल्याने बाहेर फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यात शहरातून आलेल्यांचा सुद्धा समावेश आहे. फिरतांना बरेच नागरिकांचे तोंडाला मास्क व रुमाल बांधलेला नसतो. यापूर्वी एस.टी. बसेच रेल्वे गाड्या व इतर वाहने बंद असल्याने रात्रीच्या वेळी जे मिळेल त्या वाहनाने तसेच मोटरसायकलने तर काही पायी पायदल प्रवास करुन छुपके छुपके आले. अश्या नागरिकांच्या याद्या बनविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सूचना दिल्या आहेत. आतातर शिथीलता मिळाल्याने शहरातून खेड्याकडे परत येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु यावर पाहिजे तस काही स्थानिक ठिकाणी लक्षदिल्या जात नसल्याचे समजते. 

गावातील व काही मोहल्ल्यातील, वार्डातील लोकं सुद्धा नावे सागंण्यास पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोना फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तोंडाला मास्क न लावता व सोशल डिस्टन न पाळता नागरिक वावरत आहेत. याला आळा बसावा. आतापर्यंत आपण काळजी घेवून मुक्त होतो परंतु बाहेरचे नागरिक आल्यामुळे येणाऱ्या काळातही कोरानापासून मुक्त रहावे यासाठी संग्रामपूर शहरासह ग्रामीण भागातील जनतेने सहकार्य व स्थानिक पदाधिकारी, प्रशासनाने सहकार्य करून अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

संग्रामपुरातील त्या तरुणाची अकोला हिस्ट्री
संग्रामपूर शहरातील तपासणीसाठी पाठवलेला तो युवक गेले 14 दिवस अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पत्नीच्या उपचाराकामी मुक्कामी होता. चार दिवसांपूर्वी तो तरुण संग्रामपूर येथे परत आला. 23 मेच्या रात्री त्याला त्रास जाणवू लागल्याने 24 मेच्या सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला असता त्याचे लक्षण पाहून त्यास शेगाव येथे कोविड 19 तपासणीसाठी पाठविल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीला आरोग्य विभागाकडून दुजोरा मिळाला आहे. असे असतानाही तालुक्यातील बरेच गावात सर्वच दुकाने सुरू असल्याचे चित्र आहे. वेळीच स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन कडक अंमलबजावणी करणे या निमित्ताने गरजेचे बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com