तिवसा येथील पिंगळाई नदीत आढळला इसमाचा मृतदेह 

river
river

तिवसा (जि. अमरावती) : तिवसा शहरातून गेलेल्या पिंगळाई नदीत सोमवारी (ता.18) सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका 37 वर्षीय इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांनी नदीकाठी एकच गर्दी केली होती. 

किशोर रामराव बिजवे असे मृतव्यक्तीचे नाव असून तो तिवसा प्रभाग क्रमांक 13 येथील रहिवासी होता. सोमवारी सकाळी बाजारपेठेजवळ नदीच्या खोल पाण्यात मृतदेह तरंगताना 
काही नागरिकांना दिसून आला. त्यांनी या घटनेची माहिती तिवसा पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मृत व्यक्ती हरवल्याची तक्रार रविवारी (ता. 17) त्याच्या घरच्या लोकांकडून तिवसा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

संबंधित मृत व्यक्ती शेतमजुरीचे काम करीत होता. मात्र, ही आत्महत्या की खून असा संशय नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मृत किशोर बिजवे याच्या पश्‍चात आई, पत्नी, एक लहान मुलगा व मुलगी आहे. तिवसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह तिवसा ग्रामीण रुग्णालयात शहविच्छेदन करण्याकरिता पाठविण्यात आला.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com