esakal | मुंबईहून आले चार जणांचं कुटुंब; तिघे निघाले 'कोरोना'बाघित, वर्धेत एकूण चार रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

found three corona patients in Wardha district

सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासन आणि जिल्हावासीयांनी सुटकेचा श्‍वास सोडला होता. मात्र, नव्याने रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. हिवरा तांडा येथील महिला पॉझिटिव्ह आल्याने परिसरातील गावे सील करण्यात आली होती. त्यात या गावाचा समावेश आहे. 

मुंबईहून आले चार जणांचं कुटुंब; तिघे निघाले 'कोरोना'बाघित, वर्धेत एकूण चार रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने विदर्भातील प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा पावने चारशेच्या घरात पोहोचला आहे. दुसरीकडे यवतामळमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत आहेत. असे असताना सोमवारी विदर्भातील दोन जिल्ह्यांत तब्बल तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. वर्धा जिल्ह्यात अगोदर एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. सोमवारी यात आणखी तीन रुग्णांची भर पडली. तसेच कोरोनामुक्‍त असलेल्या गडचिरोलीतही तीन रुग्ण आढळून आले आहेत. 

कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असलेल्या वर्धा जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्ण वाढल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. मुंबईहून आलेले तीन रुग्ण पोझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. यामुळे वर्ध्याची कोरोना रुग्णांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. यातील एकाचा मृत्यूही झाला आहे. सोबतच अमरावती जिल्ह्यातून सावंगी (मेघे) येथील रुग्णालय उपचार घेण्यासाठी आलेला एक व्यक्ती पोझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर सेवग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा - "मॉर्निंग वॉक' करणाऱ्या महिलांनी लॉजमध्ये पकडले एका जोडप्याला, अन्‌ मग झाले असे की...

जामखुटा येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले हे तिघेही जण आठ दिवसांपूर्वी नवी मुंबई येथून वर्धेत आले होते. हा एकूण चार जणांचा परिवार आहे. त्यांना रयाना गावातील शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यातील तिघे पोझेटिव्ह आले आहेत. त्यांना रात्री उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

यापूर्वी वर्धेतील आर्वी तालुक्‍यातील हिवरा तांडा या गावातील महिलेचा मृत्यू नंतर अहवाल पॉझिटिव्ह आला होता. वाशीम येथून उपचारासाठी आलेली एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली होती. या सर्वांच्या संपर्कात असलेल्या 59 जणांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासन आणि जिल्हावासीयांनी सुटकेचा श्‍वास सोडला होता. मात्र, नव्याने रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. हिवरा तांडा येथील महिला पॉझिटिव्ह आल्याने परिसरातील गावे सील करण्यात आली होती. त्यात या गावाचा समावेश आहे.

क्लिक करा - ट्रकमधून येत होती दुर्गंधी, नागरिकांनी थांबवून पाहणी केल्यास समोर आले धक्कादायक चित्र

उपचारासाठी रुग्णालयात दाखल 
वर्ध्यात पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हे चार जणांचे कुटुंब आठ दिवसांपूर्वी मुंबई येथून वर्धेत आले होते. त्यांना क्‍वारंटाइनही करण्यात आले होते. त्यांने नमुने घेत प्रयोगशाळेत पाठवले असता तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
- पुरुषोत्तम मडावी, 
जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

गडचिरोलीतही आढळले तीन रुग्ण

गडचिरोली जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्या तीन प्रवाशांचे कोरोना नमुने काल रात्री पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहेत. यामध्ये कुरखेडा येथील वेगवेगळ्या दोन क्वारंटाईन सेंटरचा व चामोशीमधील एका क्वारंटाईन सेंटरचा समावेश आहे. संबंधित कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. संबंधित रुग्णांकडून त्यांच्या प्रवासाचे तपशील घेणे सुरू आहे. संबंधित पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना आरोग्य विभागाकडून 16 मे रोजी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते.

loading image