मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडालीय. हा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये सापडला आहे. एका बाजूला पाय आणि दुसरीकडे कमरेच्या वरचा भाग आहे. वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गालगत हा मृतदेह सापडला असून तो कुणाचा आहे? अपघात आहे की घातपात? याचा तपास पोलीस करत आहेत.