रेल्वेने दिला महानगरपालिकेला जोर का धक्का...या योजनेतील 55 लाख पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

अकोला महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीतील न्यू तापडियानगर परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी 300 व्यासाची जलवाहिनी जठारपेठ (गणेश स्वीटमार्ट) ते सातव चौक व तेथून राम मंदिर रोडवर टाकण्यात आली होती. याच वेळी रेल्वे उड्डाण पुलांचे काम सुरू झाले.

अकोला : महानगरापालिकेच्या वाढीव हद्दीत पाणीपुरवठा करण्याकरिता बिर्ला रेल्वे गेट येथून अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामातील नियोजनाचा फटका तब्बल 55 लाख रुपयांनी बसला आहे. रेल्वे प्रशासनाने बिर्ला रेल्वे गेट व जठारपेठ रेल्वे कॉलनी या दोन्ही ठिकाणाहून रेल्वे लाइन क्रॉस करीत जलवाहिनी टाकण्याची परवानगी नाकारल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन वेळा जलवाहिनी टाकण्याचा खर्च व्यर्थ गेला आहे.

अकोला महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीतील न्यू तापडियानगर परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी 300 व्यासाची जलवाहिनी जठारपेठ (गणेश स्वीटमार्ट) ते सातव चौक व तेथून राम मंदिर रोडवर टाकण्यात आली होती. याच वेळी रेल्वे उड्डाण पुलांचे काम सुरू झाले. हे काम पूर्ण होण्यासाठी दीर्घकाळ लागणार असल्याने मध्य व दक्षिण-मध्ये रेल्वे या दोन्ही विभागाने जलवाहिनी रेल्वे लाइन क्रॉस करून टाकण्यास मनाई केली. 

आवश्यक वाचा - थरारक! या कारणामुळे त्याने तीनशे मीटर मृतदेह नेला फरफटत आणि...

यासंदर्भात भारिप-बमसंच्या गटनेत्या अड. धनश्री देव यांनी मनपा स्थायी समितीमध्ये रेल्वेची परवानगी मिळेपर्यंत जलवाहिनी टाकण्याची घाई करण्यात येऊ नये, अशी विनंती केली होती. त्यानंतर रेल्वेची परवानागी मिळण्यापूर्वीच सातव चौक ते स्व. दादासाहेब दिवेकर चौक व पुढे स्व. अरूणची दिवेकर वाचनालयाच्या शेवटपर्यंत 300 व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. पुढे रेल्वे क्वॉटर व रेल्वे लाईन ओलांडून जाणार असल्याने रेल्वेच्या परवानगीची प्रतीक्षा करावी लागली. 

हेही वाचा - अरेरे! मोफत मिळतोय तांदुळ तरी होतोय गैरप्रकार; त्या तांदुळाच्या बदल्यात...

आता रेल्वेने भविष्यातील रेल्वेच्या विकास कामांचे कारण देत रेल्वे लाईन ओलांडून जलवाहिनी टाकण्यास मनपाला परवानगी नाकारली आहे. या दोन्ही ठिकाणी अधिकारी, कंत्राटदारांच्या समन्वयाअभावी अमृत योजनेचे 55 लाख रुपये व्यर्थ गेले आहे. अनियोजन कारभारामुळे पैसा आणि वेळही वाया गेले. निधीचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी अॅड. धनश्री देव यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

पर्याय उपलब्ध
न्यू तापडियानगरला पाणीपुरवठा करण्यासाठी उमरी परिसरातून जलवाहिनी टाकण्यासाठी रेल्वेला परवानगी मागितल्या जाऊ शकते. सध्या उमरी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे 300 व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी तातडीने पावले उचल्यास न्यू तापडियानगरला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकणे शक्य होणार असा पर्यायही अॅड. . देव यांनी सुचविला आहे.

टाकलेल्या जलवाहिनीवर द्या जोडणी
न्यू तापडियानगर परिसरासाठी पाणीपुरवठा करण्याकरिता टाकण्यात आलेल्या 300 व्यासाच्या जलवाहिनीचा उपयोग जठारपेठ परिसरासाठी करण्यात यावा. या भागात 10 इंची जलवाहिनी 300 व्यासाच्या जलवाहिनाला जोडल्यास या परिसरातही योग्य प्रकारे पाणीपुरवठा होईल. शिवयय सातव चौक ते निबंधे प्लॉटपर्यंत 10 इंची जलवाहिनी टाकून या भागाला पुरवठा करण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी अॅड. देव यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Denied permission to cross the railway line to lay the waterway in akola