‘जैतादेही’ पॅटर्नमुळे खुलणार शालेय सौंदर्य; नरेगामार्फत होणार शाळेचा भौतिक विकास

development of the school will be done through MGNREGA
development of the school will be done through MGNREGA

मांजरखेड (जि. अमरावती) : देशाचे भावी आधारस्तंभ शाळेतील विद्यार्थी आहेत. त्यांचे शिक्षण आनंददायी होण्यासाठी शालेय परिसर सुद्धा उत्साहवर्धक व आनंददायी असणे आवश्‍यक आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना (नरेगा) मार्फत आता शाळा व अंगणवाडी परिसरातील भौतिक कामे होणार आहेत. यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे सौंदर्य खुलणार आहे.

पंचायत समिती चिखलदरा येथील जिल्हा परिषद शाळा जैतादेही येथील शिक्षकांनी मुलांना शालेय पोषण आहारात फळेही चाखायला मिळावी म्हणून विविध फळझाडे लावण्याचे नियोजन केले. परंतु, पाण्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे त्यांनी पंचायत समितीकडे सहकार्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी शिक्षकांची आत्मीयता बघत स्वतः रोजगार हमी योजनेमार्फत या कामाचे नियोजन केले.

गावातील लोकांना गावातच रोजगार मिळावा शिवाय शालेय मंदिराचे सौंदर्य खुलावे म्हणून त्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. पालकमंत्री यशोमती ठाकूर व नियोजन विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी सुद्धा अधिकाऱ्याची कल्पकता ओळखत सुरुवातीला जिल्ह्यातील ८३० शाळांचे प्रस्ताव मागितले.

अमरावती जिल्हातील जैतादेही प्रमाणे राज्यातील इतर शाळांचा विकास व्हावा म्हणून नुकताच २ डिसेंबरला शासनाने मनरेगाद्वारे शाळा व अंगणवाड्यांचा भौतिक विकास करून शैक्षणिक उपयोग करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला. यामध्ये जैतादेहीचा प्रामुख्याने उल्लेख असून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांचे सौंदर्य या शासन निर्णयामुळे खुलणार आहे.

रोजगारासह शालेय सुविधा

‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही योजना मुळात स्वयं समृद्धीकडून गावं समृद्ध करणारी आहे. लहान वयात मुलांना सेंद्रिय शेती व सुदृढ आरोग्य समृद्ध व्हावे म्हणून परिसर स्वच्छ असणे किती गरजेचे आहे याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही ही सुरुवात केली. शासन निर्णयामुळे आता गावकऱ्यांना गावात रोजगार व शालेय सुविधेत वाढ होणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले. 

निर्णयामुळे होणारा फायदा

यामुळे किचन शेड, खेळाचे मैदान, वृक्षलागवड, संरक्षक भिंत, रस्ते, भूजल पुनर्भरण, शौचालय, परसबाग, पेव्हिंग ब्लॉक, नाली बांधकाम, बोअरवेल, गांडूळ खत निर्मिती आदी कामे करता येणार आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com