'मी पैसे देत नाही, जे कराचे असेल ते कर'; दहा रुपयांची बॉटल अन्‌ पोलिसांची संशयास्पद भूमिका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

भांडण झाल्याचे समजताच नागरिकांची गर्दी होते. काही लोक पोलिसांना मारहाणीची माहिती देतात. काही युवका संजयला समजवण्याचा प्रयत्न करतात. उलट संजय त्यांनाच ठार मारण्याची धमकी देतो. तसेच हात उगारून मारहाण करण्यास सुरुवात करतो. घटनास्थळी पोलिस हजर असताना संजय कुणालाही जुमानत नाही. अखेर संतापलेले नागरिकच संजयला चांगलाच चोप देतात. 

समुद्रपूर (जि. वर्धा) : अवैध दारूविक्रेता समारेली दुकानात जातो. संबंधित दुकानदाराला पाण्याची बॉटल मागतो. दुकानदार बॅटल देत पैसे देण्याची वाट बघतो असतो. दारू व्रिकेता पैसे न देता दुकानाच्या बाहेर पडतो. दुकानदार हाक मारून पैशांची मागणी करतो. मात्र, दारूव्रिकेता शिवीगाळ करण्यास सुरुवात करतो. "मी पैसे देत नाही, जे कराचे असेल ते कर' असे म्हणून वाद घालतो. नंतर जो प्रकार घडतो तो वाचाच... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रपूर येथे संजय कांबळे याचे अवैध दारूविक्रीचे दुकान आहे. त्याच्या दुकानासमोरच बिकानेर मिठाईवाला राजनस्थानवाले नावने एक दुकान आहे. रविवारी सायंकाळी दारूविक्रेता बिकानेर दुकानात जातो. दुकानदाराला पाण्याची बॉटल देण्याची मागणी करतो.

हेही वाचा - अफलातून..! एमबीबीएस एम.डी. डॉक्‍टर निघाला केवळ बारावी पास

दुकानातून संजयला 10 रुपयांची पाण्याची बॉटल देतो. मात्र, पैसे न देता दुकानाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. दुकानदार हाक मारून संजयला पैसे देण्यास सांगतो. चिडलेला संजय दुकानदाराला "मी पैसे देत नाही जे कराचे असेल ते कर' असे बोलून वाद घालतो. काठीणे दुकानातील फ्रिज आणि काचेच्या रॅक फोडायला सुरुवात करतो. 

भांडण झाल्याचे समजताच नागरिकांची गर्दी होते. काही लोक पोलिसांना मारहाणीची माहिती देतात. काही युवका संजयला समजवण्याचा प्रयत्न करतात. उलट संजय त्यांनाच ठार मारण्याची धमकी देतो. तसेच हात उगारून मारहाण करण्यास सुरुवात करतो. घटनास्थळी पोलिस हजर असताना संजय कुणालाही जुमानत नाही. अखेर संतापलेले नागरिकच संजयला चांगलाच चोप देतात.

अधिक माहितीसाठी - माहेराच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी, पहिली आषाढीही सासरीच...

दुकानदाराला ठार मारण्याची धमकी

संजय दहा रुपयांच्या बॉटलसाठी दुकानदाराशी वाद घालतो. दुकानातील फ्रिज व काचांची तोडफोड करून नुकसान करतो. यात दुकानदाराचे चार लाखांचे नुकसान झाले. तसेच पोलिस ठण्यात तक्रार दाखल केल्सास ठार मारण्याची धमकी देतो. 

पोलिसांची भूमिका संशयास्पद

दारूविक्रेत्याचे दुकानदाराशी भांडण सुरू करण्याचे बघून नागरिक त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, संजय नागरिकांनाच धमक्‍या देणे सुरू करतो. तसेच त्यांना मारहाण करतो. यावेळी पोलिसांनी मात्र संजयला समज देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे नागरिकांचा रोष आणखीनच वाढतो. संतप्त होत नागरिक दारूविक्रेत्या संजयला चांगलाच चोप देतात.

क्लिक करा - पत्नीला पडला प्रश्‍न, पतीचा मृत्यू नेमका झाला कुठे? वाचा धक्‍कादायक प्रकार...

गावगुंडांचा बंदोबस्त करा

पोलिसांसमोर संजय नागरिकांशी वाद घालत असतो. घटनास्थळी पोलिस हजर असतानाही तो वाद घालत असतो. यामुळे नागरिक त्याला चांगलचे बदाळतात. यानंतर पोलिसांनी संजयला घटनास्थळावरून अटक केली. या गावगुंडांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील विविध संघटनांनी पोलिस प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute over water bottle in Wardha district