बाप रे..बाप...चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल इतके वाघ.. विभागनिहाय वाघांची संख्या जाहीर.. आकडा बघून बसेल धक्का

Division wise count of tigers is declared in maharashtra
Division wise count of tigers is declared in maharashtra

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी व्याघ्र दिनानिमित्त २०१८ साली झालेल्या व्याघ्रगणनेनुसार वाघांची आकडेवारी जाहीर केली होती. त्यात देशात 2967 वाघ तर महाराष्ट्रात ३१२ वाघ असल्याचे घोषित केले होते. राज्यातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांची तपशीलवार माहिती तब्बल एका वर्षानंतर पुढे आली आहे.

महाराष्ट्रातील वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात 2014 साली झालेल्या व्याघ्रगणनेत राज्यात 190 वाघ होते ते आता 312 वर गेले आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. त्यात राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पात १८८, तर चार विभागातील संरक्षित क्षेत्राबाहेर १०७ वाघ असल्याची उघड झाले आहे.

म्हणून वाढतेय वाघांची संख्या 

ताडोबा-अंधारी, बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा आणि सह्याद्री या सहा व्याघ्रप्रकल्पात १८८ वाघ आढळून आले आहे. या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना' राबविली जात आहे. यामुळेच या परिसरात गेल्या चार वर्षापूर्वी पेक्षा वाघांची संख्या वाढली आहे.

तब्बल इतके वाघ

विशेष म्हणजे संरक्षित क्षेत्राबाहेर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी, चंद्रपूर, मध्य चांदा या विभागात ९३ वाघ तर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ८२ वाघ आढळले. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १७५ वाघ असल्याची समोर आले आहे. पैनगंगा, टिपेश्वर, उमरेड-पवनी-कऱ्हांडला या तीन अभयारण्यात १७ वाघ आढळले. वन्यजीव विभागात २०५ वाघ आहेत. ३१२ वाघांपैकी २९८ वाघ कॅमेऱ्या ट्रॅपमध्ये आले असून १४ वाघ अखिल भारतीय व्याघ्र गणनेच्या वेळेस यवतमाळ, जळगाव, सांवतवाडी या संरक्षित क्षेत्राबाहेर आढळून आलेत. यावरून प्रादेशिक क्षेत्रातील वन कर्मचारी व अधिकारी वन्यजीव व वनसंवर्धन उत्तमरीत्या करीत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

व्याघ्र संवर्धनाला यश 
स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने 'डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना' राबविली जात आहे. स्थानिकांच्या सहभागातून वन विभाग व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश आहे.
संजय राठोड, 
वनमंत्री

कुठे किती वाघ 

बोर -  ०६
मेळघाट -  ४६
पेंच -  ४८
नवेगाव- नागझिरा - ०६
ताडोबा- अंधारी -  ८२
पैनगंगा - ०१
टिपेश्वर - ०५
उमरेड कऱ्हाडला - ११

संरक्षित क्षेत्राबाहेर

ब्रम्हपूरी डिव्हीजन - ३९
चंद्रपूर डिव्हिजन - ३१
मध्य चांदा डिव्हिजन - २३
इतर क्षेत्र - (नागपूर, जळगाव,सावंतवाडी ) - १४

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com