Diwali Festival 2020 : भाऊ, काय सांगू दिवाळीत नाही म्हणता म्हणता खूप खर्च झाला

Diwali is a time of joy celebration and expense
Diwali is a time of joy celebration and expense

नागपूर : दिवाळी म्हणजे अक्षय्य आनंदाचा सण. असा सण जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये आढळत नाही. नवीन कपडे घेणे, फटाके फोडणे, खाद्यपदार्थ तयार करणे आदी आलेच. प्रकाशाचा, समृद्धीचे पूजन करण्याचा आणि मनसोक्तपणे आनंद साजरा करण्याचा सण म्हणून आपण दिवाळीकडे पाहत असतो. दिवाळीत नवी खरेदी केली जाते आणि भरपूर खर्च केला जातो. म्हणून दिवाळी झाली की बऱ्याचजणांचे खिसे हलके झालेले असतात. यामुळे दिवाळी आली खर्च घेऊन आली असे गमतीत घरी बोलले जाते.

सद्या देशाला कोरोनाना हादरून सोडले आहे. यामुळे यंदाची दिवाळी विशेष राहणार नाही असे वाटत होते. मात्र, तसे होताना एकंदरीत स्थितीवरून दिसून आले नाही. महागाईचे संकट असतानाही नागरिकांचा उत्साह काही कमी झालेला नाही. घरांची रंगरंगोटी, शॉपिंग, गिफ्ट, स्वीट घरगुती साहित्य आदींच्या खरेदीसाठी बाजारात चांगलीच गर्दी पहायला मिळली. ‘इतना खर्च तो बनता है’ असे बोलून मोठ्या मानाना खर्च केला जातो. मात्र, किती खर्च होतो याकडे दुर्लक्ष होते.

डीजिटल माध्यम प्रभावी झाल्यापासून ऑनलाईन पाहून किंवा माहिती होऊन ऑफलाईन अनुभवण्यातून खरेदी होऊ लागली आहे. आकडेवारी सांगते की दहा पैकी जवळपास आठ जण फेसबुकसारख्या माध्यमाने प्रभावित होतात. त्यातून पुढे प्रत्यक्ष खरेदीपर्यंतचा टप्पा ग्राहकाने गाठावा यासाठी त्याला शंभर टक्के पैसे परतीची, वस्तू ठराविक मुदतीत परत करण्याचे आमिष दाखवले जाते. त्यातून मोठ्या प्रामाणीत खरेदी केली जाते.

गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनमुळे ऑनलाइन खरेदीही सुकर झाली आणि लोक घरबसल्या वस्तू मागवू लागले. म्हणजे काहीही हव असल्यास दोन सेकंदात ऑनलाइन जाऊन ती वस्तू पाहता येते. त्याची अन्य वस्तूशी तुलना करता येते. त्याचे तपशील शोधता येतात आणि ती घरपोच येते. मोबाईलवर एका बोटाने हे सगळे घडवता येते. ऑनलाइन खरेदी करीत असतानाही दिवाळीत बाजाराकडे पाय वळल्याशिवाय राहत नाहीत.

गेल्या काही वर्षांत सातत्याने ऑनलाईन शॉपिंग करण्याचा कल वाढला आहे. दिवाळीमध्ये खरेदीसाठीचे ऑनलाइन सर्च वाढतात. वर्षभरात माणूस जितका खर्च करतो त्यापैकी ४० टक्के खर्च तो सणासुदीला धरून करतो. भारतात दिवाळीपेक्षा अधिक मोठा सण कुठला? थोडी जास्तीची खरेदी केली जाते. एकदा ड्रेस जास्त घेतला जातो. मिठाई जास्तीची आणली जाते. घरात दिवे जास्तीचा पेटवला तर इतरांच्या तोंडून सहज निघतं ‘काय दिवाळी’ आहे. याचा अर्थ असा की दिवाळी आली की हात सैल सोडून खर्च केला जातो.

खर्चाची कुणाला पर्वा

घरात नवीन लाइट्स कधीही लागू शकतात; परंतु दिवाळीला दिव्यांची सजावट करण्याचा जो मूड असतो त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. घरातल्या चादरी, पडदे, कपडे, दागिने हे दिवाळीला घेण्याचा जितका उत्साह असतो, तसा आणि तितका अन्य वेळी असत नाही. कारण, यामध्ये एक सांस्कृतिक, कौटुंबिक, मैत्रिपूर्ण बंध असतो. ही खरेदी एक सोहळा असतो. मात्र, यामुळे खर्च वाढतो. परंतु, याची कुणीही पर्वा करीत नाही.

अजून एक वस्तू पदरात

माणसाच्या हातातील स्मार्टफोनने कधीही ऑनलाईन खरेदी करू शकत असलो तरी लोक दसरा-दिवाळीच्या बंपर सेलची वाट बघतात. कारण, डिस्काउंट जास्त असतात. परंतु, दसरा-दिवाळीला थोडा जास्तीचा खर्च करण्याची मनोवृत्ती असते. म्हणून ‘काँबो ऑफर्स’ अत्यंत लोकप्रिय झालेल्या आहेत. थोडेसे पैसे जास्तीचे दिले की अजून एक वस्तू पदरात पडते. फायदा ग्राहक आणि कंपनी असा दोघांचाही असतो. त्या दृष्टीने सगळं मार्केटिंग होत असते.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com