रहस्य आले समोर : डॉक्‍टरच्या लघु चित्रपटासाठी तयार झालेली ‘ती’ नव्हे तर ‘तो’; लुबाडले आठ लाख

संतोष ताकपिरे
Friday, 23 October 2020

तिने निःशस्त्र लघूचित्रपटात बेडसीन करण्यास होकार दिला. त्यानंतर कथित अभिनेत्रीने भावनिक आवाहन करून उपचारासाठी पैशाची गरज असल्याचे सांगून डॉक्‍टरांना पैसे मागितले. डॉक्‍टरांनी कथित अभिनेत्रीच्या खात्यात ऑनलाईन पैसे जमा केले. परंतु, अभिनेत्री म्हणून डॉक्‍टरांसोबत संवाद साधणारी, चॅटिंग करणारी अभिनेत्री नव्हती. तो नववी पास हार्दिक पवार निघाला.

अमरावती : सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे निर्मित निःशस्त्र या महिला अत्याचाराविरुद्ध लघूचित्रपटात बेडसीन करण्यासाठी सोशल मीडियावरून होकार देणारी कथित अभिनेत्री नसून, एक नववी पास युवक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यानेच डॉक्‍टरकडून सात लाख ७९ हजार रुपये लुबाडले.

शहर सायबर पोलिसांनी गुजरातच्या दाहोद येथील रामनगर सोसायटीमध्ये राहणाऱ्या हार्दिक अश्‍विनसिंह पवार (वय ३१) या युवकास अटक करून गुरुवारी अमरावतीत आणले व दुपारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले.

क्लिक करा - मोबाईलवर लिंक पाठवल्यानंतर आला फोन; माहिती भरल्यानंतर तरुणी लागली रडायला

शहरातील एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर महिला अत्याचारावर आधारित लघुचित्रपट तयार करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांचा एका अभिनेत्रीसाठी शोध सुरू होता. त्यांनी बेडसीनसाठी तयार होणाऱ्या अभिनेत्रीचा शोध सोशल मीडियावरून घेतला. पूजा पटेल नावाच्या फेसबुक अकाउंटवरून त्यांची एका युवतीसोबत ओळख झाली.

तिने निःशस्त्र लघूचित्रपटात बेडसीन करण्यास होकार दिला. त्यानंतर कथित अभिनेत्रीने भावनिक आवाहन करून उपचारासाठी पैशाची गरज असल्याचे सांगून डॉक्‍टरांना पैसे मागितले. डॉक्‍टरांनी कथित अभिनेत्रीच्या खात्यात ऑनलाईन पैसे जमा केले. परंतु, अभिनेत्री म्हणून डॉक्‍टरांसोबत संवाद साधणारी, चॅटिंग करणारी अभिनेत्री नव्हती. तो नववी पास हार्दिक पवार निघाला.

सविस्तर वाचा -  Video गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप

पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे, जगदीश पाली, चैतन्य रोकडे, दीपक बदरके, शैलेंद्र अर्डक, गजानन पवार, सुधीर चर्जन, संजय धंदर, ताहेर अली, पंकज गाडे, सचिन भोयर यांच्या पथकाने त्या युवकाचा छडा लावून त्याच्या मुसक्‍या आवळल्या.

फसवणुकीचे पैशातून घेतली कार

हार्दिकने डॉक्‍टरकडून पावणेआठ लाख रुपये ऑनलाईन लुबाडल्यानंतर त्यातून एक कार विकत घेतली. पोलिसांनी ती कार, पन्नास हजारांची रोकड, चार मोबाईल, एटीएमकार्ड असा सात लाख ७९ हजारांचा ऐवज जप्त केला.

हेही वाचा - ‘गेम’ करण्याची धमकी दिल्यामुळे दगडाने ठेचून कुख्यात गुंडाचा खून

आधी कोलकता, नंतर गुजरात

हार्दिक बरीच वर्षे कोलकता येथे पत्नीसोबत राहात होता. तेथे त्याने अशाच पद्धतीने अनेकांना लाखोंनी गंडा घातला. कौटुंबिक वादामुळे दीड वर्षांपासून तो गुजरातला परत आला. अन्‌ पुन्हा तेच काम त्याने सुरू केले. असे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight lakh was stolen by a ninth pass youth