ग्रुप ॲडमीनसह अकरा अटकेत; काय घडले वाचा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

बाळापूर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या पारस येथील शाकीर अली आबीद अली (वय 29) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार सोशल मीडियावर (व्हॉट्सऍप) कोरोना विषाणूच्या संदर्भात सामाजिक भावना दुखावणारा व दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल असा व्हिडिओ व मजकूर प्रसारीत केला. ही घटना शुक्रवारी (ता.3) उघडकीस आली.

बाळापूर (जि. अकोला) : समाज माध्यमांवर कोरोना विषाणू संसर्गाविषयी अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या भावना दुखावणारे चित्रफित व संदेश पसरविणाऱ्या एका व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमीनसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांना देखील पोलिसानी ताब्यात घतले. या घटनेमुळे तालुक्यातील पारस येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी येथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताही तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा- सात पिढ्यांच्या परंपरेत खंड; वाचा काय झाले असे?

व्हिडिओ व मजकूर केला होता प्रसारीत
बाळापूर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या पारस येथील शाकीर अली आबीद अली (वय 29) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार सोशल मीडियावर (व्हॉट्सऍप) कोरोना विषाणूच्या संदर्भात सामाजिक भावना दुखावणारा व दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल असा व्हिडिओ व मजकूर प्रसारीत केला. ही घटना शुक्रवारी (ता.3) उघडकीस आली. यासंदर्भात रात्री उशिरा बाळापूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्या तक्रारीवरून शनिवारी मजकूर टाकणाऱ्या इसमास व ग्रुप ॲडमीनला अटक करण्यात आली आहे. गजानन साहेबराव राऊत (वय 50) रा. लेबर कॉलनी तारफैल अकोला व अनिल पांडूरंग राऊत (वय 56) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

क्लिक करा- ... म्हणून ‘गावरान’वर वाढला जोर अन् आले पोलिसांच्या रडावर

नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये
घटना घडताच वेळेवरच पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पारस गावात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी पारस येथे भेट दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, बाळापूर ठाणेदार नितीन शिंदे व अतिरिक्त पोलिस ताफा गावात तळ ठोकून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven arrests with group admins; Read what happened