अबब... कुत्र्यांनी लचके तोडत घेतला तब्बल अकरा बकऱ्यांचा जीव!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

शेगाव (जि.बुलडाणा) : नगर परिषद हद्दीत येत असलेल्या म्हाडा कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालून एका गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर हल्ला चढविला. त्यात 11 बकरींचा मृत्यू झाला आहे. मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून, या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा असे निवेदन सुद्धा परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेला दिले, तरी कर्मचारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत आहे.

शहरातील मातंग वसतिमधील नागरिकांना शासनाने शहरालगतच्या म्हाडा कॉलनीमध्ये स्थलांतरित केली आहे. याठिकाणी सुख सुविधांचा अभाव आहे. शनिवारी पहाटे या कॉलनीमधील जगदेव फकिरा तायडे यांच्या मालकीच्या बकऱ्यांच्या गोठ्यामध्ये परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या धुंडाणे प्रवेश करून बकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये लहान-मोठ्या अकरा बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन बकऱ्या गंभीर जखमी झाले आहेत. जयदेव तायडे हे सकाळी गोठ्यामध्ये गेले असता तेथे कुत्रे बकऱ्यांचे लचके तोडत असल्याचे दिसून आले. 

महत्त्वाची बातमी - आमदार रायमूलकरांच्या वाहनाला अपघात

50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान
या घटनेमध्ये तायडे यांचा 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक वेळा नगरपालिकेमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन देऊनही नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून, ही संख्या पाच हजाराच्यावर आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा - संग्रामपूरजवळ एसटीचा भीषण अपघात

लहान बालकांचेही तोडले होते लचके
काही दिवसांपूर्वी पेठ मोहल्ला भागात लहान बालकांचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले होते. तरीही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. यामुळे आजच्या घटनेने नागरिकांमध्ये न. प. प्रशासनाप्रती रोष पाहावयास मिळाला आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांत मोकाट कुत्र्यांच्या धुमाकुळातून झालेल्या नुकसानीबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

क्लिक करा - घरफोडी उलगडीचा टक्का घसरला

मृत बकऱ्या आणल्या पालिकेत
या घटनेनंतर नागरिकांनी सर्व मृत बकऱ्या पालिकेत आणल्या होत्या. यावेळी मुख्याधिकारी यांनी कुत्रे पकडण्याची निविदा चार वेळा काढूनही कंत्राट घेण्यासाठी कोणी पुढे आले नसल्याचे सांगितले. आता याकरिता नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार असल्याचे आश्वासन दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eleven goats killed in shegaon