भाजपचे वेट अॅन्ड वॉच, सेनेच्या चर्चा तर वंचितची धाकधूक कायम

establishment of akola zilla parishad
establishment of akola zilla parishad

अकोला : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे बहुमताच्या जवळ असलेल्या वंचितसह (भारिप) महाविकास आघाडीने सुद्धा सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये भाजपची भूमिका महत्वाची असल्याने भाजपचे नेते मात्र ‘वेट अॅन्ड वॉच’च्या मूडमध्ये आहेत.

जिल्हा परिषदेच्या 53 गटांसह सात पंचायत समितींच्या 106 गणांसाठी मंगळवारी (ता.7) निवडणूक पार पडल्यानंतर बुधवारी (ता.8) मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आले. मतदारराजाने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. वंचित बहुजन आघाडी (भारिप-बमसं) निवडणुकीत सर्वाधिक 23 जागा मिळवून मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा समोर आला आहे. परंतु वंचितला सत्ता स्थापनेसाठी चार सदस्यांच्या समर्थनाची आवश्‍यकता आहे. दुसऱ्या क्रमांक ठरलेल्या शिवसेनेचे 13 सदस्य असून, सेना स्वत: महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी उत्सूक आहे. मात्र महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडे 4 आणि राष्ट्रवादीकडे केवळ 3 सदस्य असल्याने 7 सदस्य असलेल्या भाजपशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नाही. तीन अपक्ष उमेदवार निवडून आले असून, त्यापैकी दोन हे पूर्वाश्रमीचे भारिप-बमंसचे आहेत. त्यामुळे इतरांच्या तुलनेने भारिप-बमंसला सत्ता स्थापन करणे सोपे आहे. परिणामी शुक्रवारपासून सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु झाल्या असून, शिवसेनेच्या स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांची चर्चाही झाली. लवकरच सत्तेस्थापनेबाबतच्या बाबी उजेडात येणार आहेत.

प्रस्तावावर ठरणार भाजपची भूमिका
जिल्हा परिषदेत सत्तेचे समीकरण बसवण्यासाठी भाजप सध्या प्रस्तावाची प्रतीक्षा करत असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीला भाजपशिवाय पर्याय नाही. महाविकास अघाडीकडे 20 सदस्य असल्यामुळे भारिप-बमंसचे फाेडून सत्ता स्थापन करणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे महाविकास अघाडीसह भारिप-बमंसकडून काही प्रस्ताव येते काय, याची प्रतीक्षा भाजपला असल्याचे समजते. परंतु यासंदर्भात भाजचे वरिष्ठ नेते कोणत्याही प्रकारची जाहीर प्रतिक्रिया देण्यास टाळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com