सीमा सिल असतानाही या आडमार्गातून होतेय दळणवळण; राज्य ओलांडून खुलेआम प्रवास

विरेंद्रसिंह राजपूत
Friday, 24 April 2020

कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी राज्य, जिल्हा तसेच काही ठिकाणी तालुक्यासाठी वाहनाकरिता बंदी घालण्यात आली आहे.

नांदुरा (जि.बुलडाणा) : कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाने महत्त्वाच्या कामाशिवाय प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्याला फायदाही झाला असताना अधिकारी व कर्मचारी ड्युटीच्या नावाखाली तर जनता अत्यावश्यक कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांजवळ पासेस असल्याने ते मुख्य मार्गावरून प्रवास करीत असून, जनतेला पोलिस अडकवत असल्याने त्यांनी आडमार्गाचा सहारा घेऊन तालुका, जिल्हा, नव्हे अनेक राज्यांना प्रवासातून गवसणी घातल्याचे खरे चित्र आजही पहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाला आयते कोलीत मिळाल्याने जनतेत पुन्हा घबराट झाली आहे.

कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी राज्य, जिल्हा तसेच काही ठिकाणी तालुक्यासाठी वाहनाकरिता बंदी घालण्यात आली आहे. त्यातही अनेक गावांत तर स्वतः गावकऱ्यांनी गावबंदी करून पुढचे पाऊल उचलले आहे. या लॉकडाउन काळात प्रशासनानेही कडक पाऊले उचलले असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांवर करडी नजर ठेवून पोलिसांनी कारवाहीचा बडगा उगारला आहे.

महत्त्वाची बातमी - धक्कादायक! अल्पवयीन मुलीला खांद्यावर उचलून नेले मक्याच्या पिकात अन्...

असे असताना या गावावरून ‘त्या’ गावासाठी प्रवास करणाऱ्या अनेक बहाद्दरांनी वेगवेगळ्या शक्कल लढवून पुढचे पाऊल उचलत आडमार्गाचा अवलंब करत जिल्हा, तालुकाच नव्हे राज्याबाहेरही सुसाट प्रवास करत लॉकडाउनलाच आव्हान दिले आहे. सद्या बुलडाणा जिल्ह्यातील आडमार्गात जिल्हा बदलसाठी बोदवड, पिंपळगाव देवी, अजिंठा, मेहकर, अकोट, परिसरातील ग्रामीण रस्त्याचा तर राज्य बदलासाठी बुलडाणा जिल्ह्यातून मध्यप्रदेश करिता जाण्याकरिता कुऱ्हा, सोनाळा सारख्या दुर्गम रस्त्याचा वापर केला जात आहे.

हेही वाचा - Video : ‘कोरोना’त मद्यपींचे वांदे झाल्याने घडतायेत असे धक्कादायक प्रकार?

 नागरिकांनी असल्या आडमार्गाचा वापर पोलिसांच्या कारवाईच्या धाकाने सुरू केला असताना मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची पासेसच्या माध्यमातून मुख्य मार्गावरून प्रवास करत एकप्रकारे कोरोनाच्या संक्रमनालाच आव्हान दिले असल्याने या आडमार्गावरून प्रवास करणाऱ्यांपासूनही कोरोना संक्रमनाचा धोका वाढणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलिसच दर्शवितात आडमार्गाची दिशा
सध्या मुख्य रस्त्यांवर व काही ठिकाणी इतर छोट्या मोठ्या मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा असल्याने वाहनांवर कारवाही करण्याच्या सपाटा सुरू असला तरी अनेक ठिकाणी पोलिस दादा या मार्गावरून न येता आड मार्गातून जाण्याच्या सूचना करून तशा दिशा पण त्यांना सुचवीत असल्याने या वाहनधारकांना कुणाचाच धाक नसल्याचा समज आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even though the border is sealed, the traffic is through this bypass in buldana district