सेंद्रीय शेतीचा कसा केला योग्य प्रयोग एकदा बघाच!

washim farmer.jpeg
washim farmer.jpeg

शिरपूर (जि.वाशीम) : येथील प्रयोगशील तथा तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणारे शेतकरी यादवराव ढवळे यांनी आपल्या शेतात सेंद्रीय शेतीचा प्रयोग करीत संत्रा लागवड केली असून गतवर्षीपासून संत्राचे चांगले उत्पन्न मिळत आहे.

प्रयोगशील तथा तंत्राज्ञानाचा व नवनवीन यंत्राचा वापर करीत शेती करणारे तसेच कृषी विद्यापीठाच्या संपर्कात राहून वेळोवेळी मार्गदर्शन घेत शेती करणारे येथील यादवरावजी ढवळे यांनी आपल्या शेतात इतर पिकांबरोबर 2015 मध्ये आपल्या दोन एकर शेतात संत्रा संशोधन केंद्र नागपूर येथून संत्राची दोनशे रोपे आणून लागवड केली. 2015 पासून झाडांचे संगोपन करताना त्यांनी झाडांना रासायनिक खते तथा फवारणी याचा वापर केला नाही.

रसायनमुक्त शेतीचा ध्यास घेऊन संत्रा उत्पादन
संपूर्ण रसायनमुक्त शेती करीत सेंद्रीय पद्धतीचा वापर केला. गत 2019 पासून त्यांच्या संत्र्याला उत्पादन सुरू झाले. गतवर्षी त्यांनी बागवानी पद्धतीने संत्रा विकला होता. त्यावेळी दोन लाख रुपयांत देण्यात आला होता. दरवर्षी शेणखत टाकून झाडांची निगा राखीत मशागत केली जाते. रसायनमुक्त शेतीचा ध्यास घेऊन त्यांनी संत्राबरोबरच गहू, भाजीपाला हे सुद्धा सेंद्रीय पद्धतीने घेतले. शेतीच्या संदर्भात प्रयोगशीलता व उत्कृष्ट शेती करीत असल्याने त्यांनी शेतीविषयक व उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाले आहेत. 

तीन लाखांपर्यंत उत्पन्न होईल
यापूर्वी त्यांनी तिळाचे व राजमाचे देखील चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतले आहे. सोयाबीन, हळद, तीळ, गहू, संत्रा, ही पिके ते घेत असतात. दरवर्षी रासायनिक खत, फवारणीचा वापर न करता केवळ शेणखत याचा वापर करून ते सेंद्रीय शेती करीत आहेत. सध्या आपल्या दोन एकरात असलेल्या दोनशे झाडांपैकी 150 झाडांना चांगल्या प्रकारे फुले लागली असून वातावरणाचा संत्र्यावर होत असलेला पणिाम सुद्धा उत्पादनात घट करणारा ठरत आहे. तरीही सध्या असलेल्या फळांची संख्या पाहता त्यांना अंदाजे तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

नागपूर, परभणी बाजारपेठेत संत्रे विक्रीस
यासाठी त्यांना दरवर्षी बांबू बांधणी, मशागत, पाणी, मजूरवर्ग शेणखत आदींसाठी 50 हजार खर्च येतो. खर्च वजा जाता अंदाजे अडीचलाख रुपयांची मिळकत होईल असा अंदाज आहे. वातावरणाने जर साथ दिली. तर निश्‍चितच चांगल्या उत्पन्नाची आशा आहे. ही संत्रे मार्चपर्यंत तयार होतील. यासाठी स्थानिक बाजारपेठे बरोबरच नागपूर, परभणी येथील बाजारपेठेत देखील त्यांची संत्रे विक्रीस जातील. सेंद्रीय शेतीतून निर्माण झालेले असल्याने फळांना चांगली मागणी राहणार आहे.  

सेंद्रीय शेती रासायनिकपेक्षा स्वस्त
रासायनिक खतामुळे शरीरावर होणारे परिणाम तथा विविध आजार यामुळे सेंद्रीय शेती ही महागडी नसून रासायनिकपेक्षा स्वस्त दरात होते. शिवाय जमिनीचा दर्जा, कायम राहतो. संत्रा तथा इतर पिकांच्या चवीत देखील लज्जत अनुभवता येते. तसेच आजारापासून दूर राहता येते. 
-यादवराव ढवळे, प्रयोगशील शेतकरी, शिरपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com