अन त्याचा मृतदेह घेऊनच ते पोहचले पोलिस ठाण्यात.. पण असे काय घडले.. वाचा सविस्तर 

Family members bring mortal remains of a man police station
Family members bring mortal remains of a man police station

अमरावती : चार दिवसांपूर्वी जावयाने इंदला फाट्यावर मारहाण केली, त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी आधी दुकानातून गावी नेलेला मृतदेह ठाण्यात आणि ठाण्यातून पुन्हा गुरुवार (ता. २०) जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला.

शाम मारोतराव भालेराव (वय ५०, रा. मार्डी) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले. श्री. भालेराव यांचे कपडे इस्त्री करण्याचे एक दुकान जयनगर ते राजहीलनगर मार्गावर आहे. हे दुकान राजापेठ ठाण्याच्या हद्दीत येते. आज (ता. २०) सदर व्यक्तीचा मृतदेह त्याच्या इस्त्रीच्या दुकानात पडून होता. सोमवारी श्री. भालेराव यांना इंदला ङ्काट्यावर त्यांच्या जावयाने मारहाण केल्याचा आरोप आहे. 

त्यानंतर ते घरी मार्डी येथे गेले. पोळ्यांच्या सणानंतर पुन्हा राजहिलनगर येथील आपल्या दुकानात पोहचले. बुधवारी रात्री ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे पत्नी व मुलीने मार्डी येथून राजहीलनगर गाठले असता श्री. भालेराव हे दुकानात मृतावस्थेत पडलेले दिसले.

यामुळे कुटुंबीयांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून गुरुवारी (ता. २०) सकाळी गावी नेला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. चार दिवसांपूर्वी इंदला ङ्काट्यावर जावयासह त्याच्या सोबतच्या एका व्यक्तीने शाम भालेराव याना मारहाण केली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या पत्नीसह मुलीने केला, त्यामुळे त्यांनी मृतदेह ऑटोत टाकून थेट दुपारी एकच्या सुमारास ङ्क्रेजरपुरा ठाणे गाठले. 

पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. राजहीलनगर राजापेठ हद्दीत असल्याने ङ्क्रेजरपुरा पोलिसांनी राजापेठ पोलिसांना कळविले.  अन् ऑटोत टाकून आणलेला मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यास सांगितले. इर्वीनमध्ये राजापेठ व फ्रेजरपुरा पोलिस पोहचले. पुढची कारवाई राजापेठ पोलिसांनी केली.

मृत व्यक्तीच्या शरीरावर मारहाणीच्या  शस्त्राने वार केल्याची जखम नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. नातेवाइकांच्या आरोपानंतर जावयाची देखील चौकशी केली. प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.
-किशोर सूर्यवंशी,
 पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com