
वर्धा : अनेक वाहन चालकांना त्यांच्या वाहनांना आकर्षक क्रमांक घेण्याची इच्छा असते. याकरिता ते पैसेही मोजण्यासाठी तयार असतात. त्यांच्या याच पैसे मोजण्याच्या प्रकाराला शासनाने आता महसूल वाढविण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. आकर्षक क्रमाकाकरिता लागणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय शासन घेत आहे.
वाहनांवरील फॅन्सी क्रमांकाचे (नंबरचे) गणित चांगलेच बदलणार आहे. क्रमांक एकसाठी आता चार लाख रुपयांऐवजी सहा लाख रुपये घेण्याचा विचार शासन करीत आहे. त्यासाठी नवे क्रमांक आणि त्याचे अधिकृत शुल्क याबाबतची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तीन डिसेंबरपासून तीस दिवसांत याबाबत हरकती संबंधित संकेतस्थळावर देता येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
अनेकांना त्यांची सर्वच वाहने एकाच क्रमांकाची असावी असा मानस असतो. यामुळे ते वाहन खरेदी करतानाच त्या क्रमांकाची बुकिंग करतात. याकरिता ते वाटेल तेवढी रक्कम मोजण्यास तयार असतात. यामुळे फॅन्सी क्रमांकाची धूम ओळखून महसूल वाढविण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे.
2007 नंतर 15 मे 2013 ला फॅन्सी क्रमांकाची यादी आणि दर जाहीर झाले होते. दुचाकी, तीनचाकी आणि परिवहन विभागासाठी क्रमांक एकसाठी सुमारे पन्नास हजार रुपये मोजावे लागत होते. हाच क्रमांक मोटारीला किंवा अन्य वाहनांना पाहिजे असल्यास त्यासाठी चार लाखांपर्यंत शुल्क मोजावे लागत होते. मात्र, आता दुचाकीसाठी पन्नास हजारांहून एक लाख रुपयांवर तर चारचाकीसह तत्सम वाहनांसाठी चार लाखांहून सहा लाख रुपये शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. अशाच पद्धतीने काही मिरर क्रमांकांचा समावेश सुद्धा फॅन्सी नंबरमध्ये केला असून काही क्रमांक कमी केले आहेत, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
जम्पिंग क्रमांक झाला तिप्पट महाग
दुचाकीचा जम्पिंग क्रमांक तिप्पट शुल्क भरून मोटारीला घेण्याची पद्धत आहे. हे शुल्कही नव्या नियमात वाढविण्यात आले आहे. दुचाकीचा क्रमांक चारचाकीसाठी दिला जातो. साधारणत: या शुल्कात तिप्पट वाढ केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
एवढी वाढ न पचणारी
शासनाच्या निर्णयानुसार एका क्रमांकासाठी दोन ते चार लाख रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ वाहन चालकांना पचनी पडण्यास कठीण जाईल. यामुळे वाढ करताना ती हजारात असल्यास त्याचा महसूल गोळा करण्यास अधिक लाभ होईल, असे काहींचे म्हणणे आहे. महसूल गोळा करण्यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय अनेकांना न परवडणारा आहे.
शासनाने आकर्षक क्रमांकाकरिता जादा पैसे घेण्याचा निर्णय व्यक्त घेतला आहे. याकरिता त्यांच्याकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत. ज्यांना हरकती द्यावयाच्या आहे त्यांनी www.dgps.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपले आक्षेप नोंदवावे. याकरिता 3 डिसेंबरपासून तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
-विजय तिरणकर,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.