वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; आतापर्यंत नऊ जणांचा घेतला जीव, शेतकऱ्यांमध्ये भीती

Farmer killed in tiger attack
Farmer killed in tiger attack

राजुरा (जि. चंद्रपूर) : राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाला नियत क्षेत्रात पाच आक्टोबरला वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात खाबाला येथील मारोती पेंदोर (वय ६० वर्षे) हे जागीच ठार झाले. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत नऊ लोकांचा बळी गेला असून, वाघाला ठार मारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मारोती पेंदोर याचे खांबाला गावाला लागून जंगल शेजारी शेती आहे. ते पाळीव जनावरांना चरण्यासाठी जवळच असलेल्या कंपार्टमेंट १७८मधील भागात पाळीव जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. परंतु, घरी परत आला नसल्याने शोध घेतला असता जंगलात वाघाचे हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून त्यांनी शव उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठवले असल्याचे कळले आहे. या घटनेने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन शेतीच्या हंगामात वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. आतापर्यंत दहा जणांचा बळी गेल्याने कुटुंब उघड्यावर आलेले आहेत.

मात्र, नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्यास वनविभागाला यश आलेले नाही. आता कापूस वेचणीचा हंगाम सुरू होत आहे. वाघाचे दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नरभक्षी वाघाला तात्काळ पकडावे किंवा ठार करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

शेतकरी प्रचंड दहशतीत

मागील सहा महिन्यांपासून नरभक्षी वाघाला पकडण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्यामुळे परिसरातील शेतकरी प्रचंड दहशतीत असून, प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या नरभक्षी वाघाला ठार करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com