शेतातील उभी पऱ्हाटी उपटून शेतकऱ्यांवर आली गहू पेरण्याची वेळ; बळीराजाच्या डोळ्यात पाणी

Farmers are changed their crop because of Insects on crops
Farmers are changed their crop because of Insects on crops

दिग्रस (जिल्हा:यवतमाळ):- बोंडअळीच्या रोगराईमुळे दरवर्षी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे.  यंदा दुसऱ्याच वेचणी नंतर मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला.  अतिवृष्टीचा फटका आणि  बोंड अळीचे आक्रमण अशा दुहेरी संकटा मुळे कापूस उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे .बोंडअळीने शेतकऱ्यावर पऱ्हाटी उपटून गहू पेरण्याची पाळी आली आहे, सरकार व कृषी  विभागाच्या दुर्लक्षीत व वेळ काढू धोरनामुळे *“उपट पऱ्हाटी  पेर गहू'' हि प्रचलीत म्हण खरी  ठरतांना दिसत आहे.

बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरलेल्या कृषी विभागासह महसुल प्रशासन व विमा कंपण्या बघ्याच्या भुमीकेत असल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत असून दर वर्षी होत असलेल्या या नुकसानी पासून सुटका मिळण्यासाठी मायबाप सरकारने नवीन संशोधित वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलासा मीळवून  द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेतमागील काही वर्षात अस्मानी संकटामुळे सोयाबीनला  फटका बसत असल्याने या वर्षी  नगदीचे पिक म्हणून शेतकरी वर्ग पुन्हा कपाशी कडे वळला. 

दिग्रस तालुक्यामध्ये जवळपास वीस हजार हेकटरवर यंदा खरीप हंगामामध्ये कपाशी लागवड करण्यात आली परंतु मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचे प्रादुर्भाव झाल्यामुळे दुसऱ्या वेचणी नंतर शेतकऱ्यांना  कपाशीचे पीक उपटून फेकण्याची नामुष्की आली आहे.शिवारात उपटून  फेलेल्या कपाशीचे ढीग जळताना दिसू लागले असून कापूस उत्पन्न घटून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.तर अनेक शेतकऱ्यांनी उभ्या कपाशीत गुरढोर सोडून तर कीत्येकांनी ट्रॅक्टर व रोटाव्हेटर  फीरवून रान मोकळे केले आहे.

या वर्षी पावसाने दानादान उडविल्यामुळे सोयाबीनला फटका बसला तर काही प्रमाणात  कपाशीच्या पिकाला बाधा निर्माण झाली. शिवाय कपाशीला  बोंड लागवड कमी झाली. अशा वेळी आधीच उत्पन्न कमी येणार असल्याचे  जाणवत होते. दुसऱ्या वेचणीच्या वेळी कापसावर बोंड अळी मोठ्या प्रमाणात दिसू लागली. पुढे कापूस  हाती येणार नाही याची जाणीव शेतकऱ्यांना झाल्याने रोगराई जास्त पसरू नये म्हणून पऱ्हाटी उपटून ती जाळून टाकली. 

निदान  रब्बी हंगामा मधील कोणते पीक तरी घेता येईल याकडे सध्या शेतकरी  वळतांना दिसत आहेत. ज्या प्रमाणात डिजिटल इंडीयाच्या या आधुनिक युगात नवीन सुधारित संस्करण येत आहेत.त्याच प्रमाणे कपाशी बियाण्याचे नवीन सुधारित वाण देणे आता अत्यंत गरजेचे आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावे.या वर्षीचे तर उत्पन्न आधीच कमी येणार होते परंतु आता बोंडअळीच्या आक्रमणाने तर आमच्यापुढे मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली असल्याची खंत शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com