चूक नक्की कोणाची? शेतकऱ्यांची की प्रशासनाची? 'सन्मान'ची रक्कम भरण्याबाबत संभ्रम

Farmers are in confusion about returning money to government
Farmers are in confusion about returning money to government
Updated on

जेवनाळा (जि. भंडारा)  : पंतप्रधान सन्मान किसान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर शासनाने प्रतिवर्षी सहा हजार याप्रमाणे रक्कम टाकण्यात आली. या पद्धतीने त्यावेळी दोन-दोन हजार रुपये जमा केले. परंतु, आता आपण या योजनेत अपात्र आहात असे ठरवून ती रक्कम वसुलीचे काम प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. यामुळे तालुक्‍यातील बहुतांश शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच ती रक्कम भरण्याबाबतही कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांकडून अशा पद्धतीने दिलेली रक्कम प्रशासनास वसूल करायच्या होत्या, तर आधी दिलीच कशाला? असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांकडून होत आहे. अगोदर सन्मान करून नंतर अपमान करण्याची ही पद्धत चुकीची आहे. यामध्ये नेमकी चूक प्रशासनाची की, त्या शेतकऱ्यांची हाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

वास्तविक पाहता, जे कोणते शेतकरी असून आयकरसुद्धा भरतात. त्यांची नावे या योजनेत त्यावेळी समाविष्टच का केली? हा खरा प्रश्न आहे. यामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी आणि संपूर्ण प्रशासनाला जबाबदार धरून कारवाई का केली नाही? त्यांच्यावर कामात हलगर्जीपणा आणि शासनाला चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवून त्यांच्याकडूनच ही रक्कम वसूल करण्यात यावी, अशीही मागणी यानिमित्ताने काही शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मानाची रक्कम टाकण्यापूर्वी मंडळ अधिकारी, तलाठी यांनी हे काम जबाबदारीने केले असते तर, शासनाची एवढी मोठी रक्कम आजपर्यंत अडकून पडली नसती. तसेच आता तीच रक्कम वसूल करण्याचीही वेळ आली नसती हेही तेवढेच मात्र, खरे आहे.
 
संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com