शेतकरी ते ग्राहक थेट कलिंगडाची विक्री...शेती बनली फायदाची; कोरोनामध्येही आर्थिक उन्नतीकडे

farmer to customer fruit sale in Sindkhedraja.jpeg
farmer to customer fruit sale in Sindkhedraja.jpeg

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असल्यामुळे शेती फायदेशीर ठरत आहे. त्यामध्ये मागील काही वर्षापासून पाऊस कमी असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. परंतु शेतकर्‍यांनी त्यावर मात करून नवनवीन पीक घेत असून त्यांचा आर्थिक फायदा शेतकर्‍यांना होताना दिसून येते आहे.

त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत सिंदखेड राजा तालुक्यातील हनवतखेड येथील शेतकरी साईनाथ रामदास मांटे यांनी आपल्या शेतांमध्ये कलिंगड लागवड केली. या लागवडीतून त्यांना 1 एकरातून 12 टन कलिंगडाचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. व त्यांची विक्री थेट शेतकरी ते ग्राहक अशी चालू असल्यामुळे कलिंगडाला भाव सुद्धा चांगल्याप्रकारे मिळत आहे.

कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले फळ असल्यामुळे कलिंगडला उन्हाळ्या मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून मागणी असते. शेतकरी साईनाथ रामदास मांटे यांनी आपल्याकडील 1 एकक मधील शेती मध्ये कलिंगडाची लागवड केली. पाण्याचे योग्य नियोजन करून ठिबक सिंचन करून कलिंगडला पाणी देण्यासाठी योग्य वापर केला. बियाणे, ठिबक सिंचन, खते, कीटकनाशक, मजुरी आणि इतर खर्च असा मिळून 1 एकर शेतीसाठी 50 हजार रुपये त्यांना खर्च आला. 

1 एकर मध्ये 12 टन कलिंगडाचे उत्पादन अपेक्षित आहे.त्यापैकी 7 ते 8 टन कलिंगडाची विक्री झाली आहे. उर्वरित कलिंगडाची विक्री सुरू आहे. जवळपास 1 लाख 50 हजार रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यापैकी 50 हजार रूपये खर्च झाला असून 1 लाख रुपये निव्वळ नफा राहण्याची अपेक्षा त्यांनी दैनिक सकाळ सोबत बोलताना व्यक्त केली. साईनाथ रामदास मांटे हे खासगी वाहनाने सिंदखेड राजा तालुक्यातील गावोगांवी जावून कलिंगडाची विक्री करत आहे. 

शेतातील कलिंगडाची दररोज काढणी करण्यात येत असल्यामुळे ग्राहकांना ताजे व टवटवीत कलिंगड कोरोनाच्या मध्ये विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहक सुद्धा  आनंदाने कलिंगड खरेदी करतात. कलिंगड लागवडीसाठी वापरलेली आधुनिक पद्धत, खते, तणनाशक, कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले व्यवस्थापन यामुळे कलिंगडांचे चांगले उत्पादन घेण्यात यश आल्याचे शेतकरी साईनाथ मांटे यांनी दैनिक सकाळ सोबत बोलताना सांगितले.

कलिंगड शेतीसाठी कुटुंबाचा ही सहभाग
शेतीमध्ये कष्ट करण्याची मानसिकता सध्या कमी होत आहे. तरी सुद्धा साईनाथ मांटे यांच्या कुटुंबाने कलिंगडाची लागवड करून चांगल्याप्रकारे उत्पादन घेतले आहे. त्यासाठी त्यांचे वडील रामदास मांटे, आई यशोदा, पत्नी लता, दोन मुले प्रणव व सौरभ हे सुद्धा शेतीच्या कामासाठी मदत करत त्यांमध्ये पाणी देणे, फवारणी करणे, शेतातील तण काढणे, कलिंगड जमा करणे, यासह अनेक काम कुटुंबातील सदस्य मदत करत असतात. 

कलिंगड विक्री साठी तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा साईनाथ मांटे हे करत आहे. ज्या गांवामध्ये कलिंगडाची विक्री करायची आहे स्थानिक नागरिकांना मोबाईल व्हाट्सअप ला मॅसेज टाकून माहिती दिल्या जाते. त्यामुळे वाहन गांवामध्ये दाखल होताच कलिंगड खरेदी साठी येत असतात. ग्राहकांना कलिंगड विक्री करताना सोशल डिस्टन्स नियम पाळूनच ग्राहकांना कलिंगडाची विक्री केली जात आहे.

कलिंगड शेती फायदेशीर ठरली
पारंपरिक पिकांना फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन पिके घेतली तर शेतकर्‍यांना त्यांचा फायदा होतो. त्यामुळे शेतांमध्ये  कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कलिंगड शेती फायदेशीर ठरली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पारंपरिक पीक न घेता फळबागेची लागवड करून स्वतःची आर्थिक उन्नती साधावी.
-साईनाथ रामदास मांटे, कलिंगड शेतकरी हनवतखेड ता.सिंदखेड राजा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com