Video : घर बैठे बैठे क्‍या करे म्हणत दोन बहिणींनी केले हे...

संदीप रायपूरे 
सोमवार, 6 एप्रिल 2020

21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अनेक जण आपल्या घरीच असले तरी काही लोक या लॉकडाऊनचा सकारात्मक फायदा घेत आहेत. विनोद दुर्गे या शेतकीयाच्या दोन्ही मुलीन हे आपल्या कौशल्यातून सिद्ध केल आहे.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : लॉकडाऊनमुळे सार काही थांबलं आहे. लोकांना घरी बसन्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. या काळात काहींनी पुस्तकांचा आधार घेतला तर काही आयुष्यात कधी न केलेली काम करू लागली आहेत. काही जण सोशल मीडियावर आपला वेळ घालवत आहे. मात्र, वेळेचा सदउपयोग कसा करावा ते शिकाव तर या दोन बहिणींकडून... 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका... तालुक्‍यातील खराळपेठ येथील रहिवासी विनोद दुर्गे... व्यवसायाने शेतकरी... त्यांना प्रेरणा व अर्पणा नावाच्या दोन मुली... त्यांच्या घराला लागूनच अडीच एकर शेती... शेतीच्या कामासाठी त्यांनी ट्रॅक्‍टर खरेदी केला... मात्र, लॉकडाऊनमुळे सारे काम थांबले. अशात काय कराव म्हणून विनोद दुर्गे यांनी दोन्ही मुलींना ट्रॅक्‍टर शिकविण्याचा निर्णय घेतला. मुलींनी अतिशय उत्साहाने ट्रॅक्‍टर शिकण्यास तयार झाल्या. 

अधिक माहितीसाठी - अंबर दिव्याच्या गाडीतून उतरलेल्या अधिकाऱ्यातील माणूस बघून ते झाले भावुक...

सुरुवातीला मोठी मुलगी प्रेरणा ट्रॅक्‍टर चालवायला शिकली. यांनतर तिने आपल्या लहान बहिणीलाही ट्रक्‍टर शिकवले. दोन्ही बहिणी आता ट्रॅक्‍टर चालविण्यात तरबेज झाल्या आहेत. प्रेरणा अकरावीत तर अर्पणा दहावीत शिकते. अभ्यासातही त्या हुशार आहेत. पण, आपल्या अंगी कला असाव्यात व त्याचा आपल्या कुटुबींयाना फायदा व्हावा या हेतून आपण ट्रॅक्‍टर शिकण्याचा निर्णय घेतल्याचे प्रेरणानी सांगितले. 

विनोद दुर्गे व पत्नी दोघेही शेतात मेहनत घेतात. त्यांच दुसर शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. घराला लागून असलेल्या अडीच एकर शेती व गावापासून दूर असलेल्या दोन एकर शेतात कामाच नियोजन करताना आई-वडिलांना होणारा त्रास दोघी बहिणींनी अगदी जवळून बघितला आहे. आता ट्रॅक्‍टर शिकण्यामुळे आई-वडिलांना होणारा त्रास बरासचा कमी होईल असा आशावाद त्यांना आहे. 

21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अनेक जण आपल्या घरीच असले तरी काही लोक या लॉकडाऊनचा सकारात्मक फायदा घेत आहेत. विनोद दुर्गे या शेतकीयाच्या दोन्ही मुलीन हे आपल्या कौशल्यातून सिद्ध केल आहे. आता तर त्या कपाशीचे फणकट काढण्यासाठी ट्रॅक्‍टरचा उपयोग करू लागल्या आहेत. 

अधिक वाचा - मला नकोय बलात्कारातून राहिलेला गर्भ, नागपूर उच्च न्यालायात याचिका

गावातील मंडळी तोंडात बोट घालू लागली

महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूने दहशत निर्माण केली आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासन, सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. याचाच एक भाग म्हणून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशावेळी लोकांना आपल्या घरी राहावे लागत आहे. मात्र, शेतकऱ्याच्या दोन्ही मुलीने लॉकडाऊनचा फायदा घेत चक्क ट्रॅक्‍टर चालविण्याचे कौशल्य प्राप्त केले. आता तर त्या आपल्या शेतात कामालाही लागल्या आहेत. त्यांना ट्रक्‍टर चालविताना बघून गावातील मंडळी तोंडात बोट घालू लागली आहेत. 

आई-वडिलांना मदत करीत आहोत 
लॉकडाऊनमुळे घरी राहून आम्हाला कंटाळा आला होता. बाबा सहज म्हणाले बेटा ट्रॅक्‍टर चालवायला शिकणार का? मग मी तात्काळ तयार झाली. मी ट्रॅक्‍टर चालविणे शिकल्यानंतर माझ्या लहान बहिणीला देखील शिकविले. आम्ही दोघी बहिणी मिळून आता शेतातील काम करून आई-वडिलांना मदत करीत आहोत. 
- प्रेरणा विनोद दुर्गे, खराळपेठ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's daughter learned to drive tractor in Chandrapur