esakal | अंगाईतकरांनी तयार केल्या लाकडापासून वस्तू; लॉकडाऊन मध्ये जोपासला छंद
sakal

बोलून बातमी शोधा

पोळा विशेष : नव्या पिढीसाठी शेतीशी निगडित वस्तूंचा खजिना

पोळा विशेष : नव्या पिढीसाठी शेतीशी निगडित वस्तूंचा खजिना

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित असलेल्या अनेक वस्तू आज नामशेष झाल्या आहेत. शेतकऱ्यांची मुले असूनही नव्या पिढीला शेतात उपयोगी पडणाऱ्या वस्तूची माहिती नाही. पेरणी, वखरणी साहित्यांची ने-आण करणे, बैलाशी संबंधित वस्तूंबाबत ते अनभिज्ञ आहेत. नव्या पिढीला या वस्तू माहिती व्हाव्यात यासाठी राजेश इंगाईकर यांनी लॉकडाऊनच्या काळात छंद जोपासत हस्तकलेतून लाकडापासून वस्तू तयार केल्या आहेत. आपल्या कलाकृतीतून त्यांनी निर्जीव लाकडेही संजीवकेली आहे. शेतकऱ्यांशी निगडित अनेक वस्तूंचा खनिजांचे त्यांनी घरी साकारला आहे.

बाभूळगाव तालुक्यातील वाटखेड खुर्द येथे राहणारे, शेती कसणारे राजेश हनुमंत अंगाईकर यांनी नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी शेतीशी संबंधित वस्तू तयार केल्या आहे. लाकडांत जीव ओतून त्यांनी अप्रतिम वस्तू तयार केल्या. रंग देऊन त्याला आयाम दिला. त्यामुळे पाहणाऱ्यांना त्या वस्तूबद्दलची माहिती घेण्याचा मोह आवरत नाही.

हेही वाचा: नागपूर : पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

अनेक पिढीपासून अंगाईतकर यांचा मुख्य व्यवसाय शेती. असे असले तरी आजच्या पिढीला शेती तसेच शेतीशी संबंधित वस्तूंची फारशी माहिती नाही. आधुनिक काळात जुन्या वस्तू कालबाह्य झाल्या आहेत. त्या जागी आधुनिक तंत्रज्ञातून तयार झालेल्या वस्तू आल्या आहेत. पेरणी यंत्रापासून तर काढणीपर्यंत सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने होत आहे.

नांगर, वखर, दमणी, तिफण यासाहित्यासोबत बैलाला सजावटी लागणारे बाशिंग, मथाटी, मुस्के, घुंगरू, टापर, धान्य साठवणुकीसाठी असणारी कणगी अशा अनेक वस्तू लोपपावल्या आहेत. नव्या पिढीला या वस्तूंची माहिती व्हावी, शेतीशी त्यांची नाळ जुळून राहावी यासाठी राजेश अंगाईकर यांनी आपला छंद जोपासत वस्तू तयार केल्या आहेत. कोरोनासंसर्गामुळे लॉकडाऊन असलेल्या काळात त्यांनी आपला हस्तकलेचा छंद जोपासत वस्तूंची निर्मिती केली आहे.

शाळा स्तरावर प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना या वस्तूंची माहिती देण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, कोरोनामुळे दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे त्यांचे काम सध्या अपूर्ण आहे. शाळा सुरू झाल्या की वस्तूंची माहिती ते विद्यार्थ्यांना देणार आहे. याकामात त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही त्यांना मदत केली. अनेक वस्तूंचे शिल्प त्यांनी तयार केले असून नव्या पिढीसमोर ते शेती, शेतकऱ्यांची माहिती पोहोचविणार आहे.

हेही वाचा: रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर

शेतकऱ्यांची मुले असले तरी आधुनिक काळामुळे नव्या पिढीला शेती, शेतकऱ्यांचे साहित्य याबाबत फारशी माहिती नाही. आपल्या पूर्वजाशी कशा पद्धतीने शेती केली, त्यासाठी लागणारे साहित्य यांची माहिती व्हावी, या उद्देशाने या वस्तू तयार केल्या आहेत. हस्तकलेचा छंद आहे. कामाच्या व्यापात तो छंद जोपासता आला नव्हता. लॉकडाऊनच्या काळात छंद जोपासण्यासाठी वेळ मिळाला. यावेळेत या वस्तू तयार केल्या. नव्या पिढीला या वस्तूंची माहिती व्हावी, एवढाच उद्देश माझा आहे.
- राजेश इंगाईतकर
loading image
go to top