
रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देणाऱ्या चणा विक्रीचे शासकीय केंद्र सुरू होण्यास यंदा विलंब झाला. त्यात केंद्र सुरू होताच पंधरवड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागू झाले
अमरावती - विदर्भात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे चण्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र असं असतानाही तब्बल 24 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपला चणा शासकीय केंद्रावर जाऊन विकल्याची माहिती मिळतेय.
नाफेडने चणा खरेदी बुधवारपासून बंद केली आहे. यंदाच्या रब्बी हंगामातील चणा विक्रीवर कोरोनाचे सावट असतानाही जिल्ह्यातील 24 हजार 196 शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रांवर पोहोचून चणा विकला. जिल्ह्यात 4 लाख 22 हजार 804 क्विंटल चणा नाफेडने खरेदी केला. त्यात तब्बल 195 कोटी 33 लाख रुपयांची उलाढाल झाली अशी माहिती मिळतेय.
हेही वाचा; त्याची नजर पडली एका मुलाच्या आईवर; नंतर घडला हा प्रकार...
रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देणाऱ्या चणा विक्रीचे शासकीय केंद्र सुरू होण्यास यंदा विलंब झाला. त्यात केंद्र सुरू होताच पंधरवड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागू झाले आणि तब्बल 70 दिवस लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना केंद्रावर पोहोचण्यास अडचणींचा सामना करावा लागला.
नाफेडने जिल्ह्यात विदर्भ मार्केटिंग आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला अभिकर्ता म्हणून नियुक्त केले होते. या दोन्ही यंत्रणांची अकरा केंद्र होती. जिल्हा मार्केटिंगच्या अचलपूर, चांदूर रेल्वे, दर्यापूर, धारणी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा या सहा केंद्रावर 11 हजार 47 शेतकऱ्यांनी 2 लाख 2 हजार 222 क्विंटल तर विदर्भ मार्केटिंगच्या धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरूड, अमरावती, चांदूर बाजार व अंजनगावसुर्जी या पाच केंद्रावर 13 हजार 149 शेतकऱ्यांनी 2 लाख 20 हजार 581 क्विंटल चणा हमीदराने विकला. यामुळे जिल्ह्यात नाफेडची चणा विक्रीत 195 कोटी 33 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
नक्की वाचा; गोंदियात आता रॅपिड अँटीजन तपासणी...कोरोनाचे होणार निदान...अंमलबजावणी सुरू
बुधवारी चणा खरेदीची मुदत संपली. यापूर्वी ती 15 जूनला संपुष्टात आली होती, मात्र लॉकडाउनचा फटका बसल्याने शेतकऱ्यांना केंद्रावर पोहोचता आले नव्हते. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. पण महासंघाने व नाफेडने एक महिना मुदतवाढ देत ती 15 जुलैपर्यंत खरेदी सुरू ठेवण्याची मुभा दिली. शेतकऱ्यांना चुकारे देणे सुरू असून अखेरच्या टप्प्यातील चुकारे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.
संपादन - अथर्व महांकाळ