सुरक्षारक्षकाची शेतकऱ्यांसोबत मुजोरी, संतप्त शेतकऱ्यांनी बँकेत घुसून केली तोडफोड

टीम ई सकाळ
Friday, 30 October 2020

रब्बी हंगामाच्या कर्जासाठी परिसरातील काही शेतकरी महागावच्या युनियन बँकेत (union bank) गेले होते. परंतु, त्यावेळी सुरक्षारक्षकांनी या शेतकऱ्यांशी अरेरावी केली आणि त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.

यवतमाळ : जिल्ह्यातील महागावमध्ये पीक कर्ज आणि नवीन खाते उघडण्यासाठी शेतकरी गेले असता बँकेतील सुरक्षारक्षकांनी मुजोरी केली. तसेच शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बँकेत प्रवेश करत तोडफोड केली. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली.

हेही वाचा - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाची...

रब्बी हंगामाच्या कर्जासाठी परिसरातील काही शेतकरी महागावच्या युनियन बँकेत (union bank) गेले होते. परंतु, त्यावेळी सुरक्षारक्षकांनी या शेतकऱ्यांशी अरेरावी केली आणि त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लांबून आलेले शेतकरी चांगलेच संतप्त झाले होते. शेतकऱ्यांनी 'आम्ही कर्ज घेण्यासाठी  आलो आहोत', अशी विनंतीही केली. तरीही सुरक्षारक्षकांनी त्यांना बँकेच्या आत जाण्यास मनाई केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटी सुरक्षारक्षकाला बाजूला केले आणि बँकेचा दरवाजा उघडून बँकेत प्रवेश केला. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेतील साहित्याची तोडफोड केली.

हेही वाचा - सावधान! तुमची कार घराबाहेर असल्यास लक्ष द्या; गावगुंड करताहेत कारची तोडफोड आणि जाळपोळ 

सध्या परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच बँकेकडून त्यांना अतिशय अपमानस्पद वागणूक दिली जात आहे. यावरून यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी नुकतीच बँकेची बैठक घेऊन शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याच्या सूचना दिल्या. मात्र, बँकेचे अधिकारी या सूचनांना केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers vandalized bank in mahagaon of yavatmal