अरे वा! दुग्गड पेट्रोल पंप देणार शेतकऱ्यांना मिळणार घरपोच डिझेल सेवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 एप्रिल 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय अभिनंदनीय असून, महाराष्ट्रात घरपोच डिझेल सेवा देणारा पातूर शहरातील एकमेव पेट्रोल पंप असल्याचे बोलल्या जात आहे. या सेवेचा लाभ शेतकऱ्यांसह इतर ग्राहकांना घ्यायचा असल्यास त्यांनी 9604747300, 9850486891 मोबाईल नंबरवर संपर्क करावा. सेवा देणाऱ्या टँकरची क्षमता सहा हजार लीटर असून, द्वारपोच सेवा देत असल्यामुळे कोणत्याच प्रकारचा अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना पडणार नाही.

पातूर (जि. अकोला) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाउन असून, त्यामुळे सर्वच उद्योग-धंदे बंद आहेत. त्याचा सर्वाधिक फटका जगाचा पोशिंद्याला बसला आहे. शेतीविषयक कामासाठी वापरली जाणारी ट्रॅक्टर व शेतमाल ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना डिझेलचा तुटवडा पडत होता. त्यामुळे शेती व शेतीपूरक कामे खोळंबली होती. परंतु, पातूर-वाशीम रोडवर असलेले दुग्गड पेट्रोल पंपाचे संचालक पंजाबराव मोडक यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात देत डिझेलची घरपोच सेवा देण्याचा उपक्रम सुरू केला असून, त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांना होणार आहे. मोबाईल ब्राऊजरचे उद्‍घाटन जिल्हा पुरवठा अधिकारी काळे, तहसीलदार दीपक बाजड, ठाणेदार गजानन गुल्हाने, पंजाबराव मोडक, बाळा लाहोरे व सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सिंचे पालन करून करण्यात आले.

क्लिक करा- धक्कादायक! अल्पवयीन मुलीला खांद्यावर नेले मक्याच्या पिकात अन्...

पेट्रोल पंपच्या भावातच मिळणार डिझेल
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय अभिनंदनीय असून, महाराष्ट्रात घरपोच डिझेल सेवा देणारा पातूर शहरातील एकमेव पेट्रोल पंप असल्याचे बोलल्या जात आहे. या सेवेचा लाभ शेतकऱ्यांसह इतर ग्राहकांना घ्यायचा असल्यास त्यांनी 9604747300, 9850486891 मोबाईल नंबरवर संपर्क करावा. सेवा देणाऱ्या टँकरची क्षमता सहा हजार लीटर असून, द्वारपोच सेवा देत असल्यामुळे कोणत्याच प्रकारचा अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना पडणार नाही. ज्या दरात पेट्रोल पंपावर डिझेल मिळते त्याच दरात द्वारपोच सेवा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लॉकडाउन असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी व शेतीपूरक व्यवसायासाठी डिझेलची समस्या येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सुद्धा द्वारपोच सेवा देणाऱ्या उपक्रमाला त्वरित मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा- बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र शाळामध्ये ऑनलाइन ‘अभ्यासमाला’!

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आभार
भारत सरकारच्या या उपक्रमांमधून महाराष्ट्राला दहा गाड्या दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याला सर्वप्रथम मान मिळाला त्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आभार. या उपक्रमामुळे लॉकडाउन काळात शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व श्रम वाया जाऊ नये, शेतीविषयक कामात अडथळा येऊ नये, व सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन व्हावे, यानिमित्ताने गर्दी टाळण्यासाठी तातडीने राबविला जात आहे.
-पंजाबराव मोडक, संचालक, भारत पेट्रोलियम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will get home diesel service