...या स्थितीतही श्रद्धेपोटी मुस्लिम बांधव धरतात ‘रमजानचे रोजे’
जानेफळ (जि.बुलडाणा) : एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील रखरखत्या उन्हात प्रारंभ झालेल्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांच्या रोजांना (निरंक उपवास) सुद्धा सुरवात झाली आहे. तापणाऱ्या कडक उन्हात गर्मीने जिवाची लाही लाही होत कडाक्याची तहान लागून घसाला कोरड पडत असताना अशा कडक उन्हाळ्यात सुद्धा अल्लाहच्या श्रद्धेपोटी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव, महिला तसेच तरुण रोजे (निरंक उपवास) धरीत असल्याने त्यांच्या श्रद्धेप्रती मोठे कुतूहल निर्माण होत आहे.
महत्त्वाची बातमी - धक्कादायक : ‘त्या’ कोरोना बाधितांच्या संपर्कात आले 39 पोलिस
पवित्र रमजान महिन्यास मुस्लिम धर्मात मोठे महत्त्व आहे. इबादतचा महिना अर्थात अल्लाह ला प्रसन्न करून घेण्याचा हा महिना मानला जातो. इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार परिस्थितीला सामोरे जात त्यास समरस होऊन त्याचा सामना करण्याचे सांगण्यात आलेले असल्याने सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेले संकट व उद्भवलेल्या परिस्थितीशी समरस होऊन शुक्रवार (ता.25) रमजान महिन्याचे स्वागत केले तर, शनिवार (ता.26) पवित्र रोजाला (उपवासाला) सुद्धा सुरवात केली आहे.
हेही वाचा - काय म्हणता, चक्क सावलीच होणार गायब!
सकाळी 4 वाजता सहेरी (थोडे जेवण) केल्यानंतर सायंकाळी 7 वाजेपर्यंत उपाशीपोटी राहून यादरम्यान अन्नाचे कुठलेही कण किंवा पाण्याचा थेंब तसेच तोंडात थुका जमा करून सुद्धा न गिळता सुमारे 15 तास उपाशीपोटी राहून हा निरंक उपवास धरल्या जात आहे. दिवसभरात 5 वेळेची नमाज तसेच कुराण पठण सुद्धा केल्या जात आहे. सूर्य उगवण्यापूर्वी अन्नाचे ग्रहण करायचे.
संपूर्ण दिवस सूर्यास्त होईपर्यंत निरंक उपवास पाळायचा व सूर्यास्त झाल्यानंतर प्रार्थना करून मगरीबची नमाज पठण करण्यापूर्वी उपवास सोडायचा आणि त्यानंतर तराबीची सुद्धा नमाज पडल्या जाते. असा हा नियम संपूर्ण महिनाभर पाळला जातो. या पवित्र महिन्यांमध्ये कुराण शरीफ चे वाचन केल्या जाते आणि वाचन झाल्यानंतर चिंतन मनन केल्या जावे असा नियम आहे. रमजान महिन्यातील 30 व्या रोजाला (उपवासाला) चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद साजरी केल्या जाते.
या दिवशी मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून अत्तर लावीत गावाबाहेर असणाऱ्या नमाजगाहवर पोहोचून नमाज पडल्यानंतर एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देतात. घरी आल्यानंतर नातेवाईक, मित्र यांना शीरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करून एकमेकांच्या घरी जाऊन शिरखुर्म्याचा आस्वाद घेतात. संयम, सदाचार व आत्मशुद्धीचे पर्व म्हणून रमजान महिना हा ओळखल्या जातो.
घरीच सुरू होतेय नमाज पठण
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची भीती लक्षात घेता शासनाच्या आवाहनानुसार मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे मशीद मध्ये जाऊन नमाज पठण करण्या ऐवजी यावर्षी आप-आपल्या घरातच सेफ डिस्टेंस पाळून नमाज पठण सुरू केले आहे. प्रत्येक घरात महिला व पुरुष सेफ डिस्टेंसला महत्त्व देऊन पवित्र रमजान महिन्याची नमाज अदा करीत आहेत.
इफ्तार पार्टी सुद्धा बंद
पवित्र रमजान महिन्याचे उपवास ठेवणाऱ्यांसाठी सायंकाळी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी समाज बांधवांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असते आणि भोजन दिल्या जाते. परंतु यावर्षी कोरोनाच्या संसर्गाची संभाव्य भीती लक्षात घेता गर्दी टाळण्याच्या दृष्टीने इफ्तार पार्टी सुद्धा टाळण्यात येत आहे.
नमाज दरम्यान कोरोना संपुष्टीसाठी दुवा
पवित्र रमजान महिन्यात दिवसातून पाच वेळा नमाज पठण करीत असताना मुस्लिम बांधव तसेच महिला सुद्धा नमाज दरम्यान दुवा करीत आहे. यावेळी आयसोलेशन वॉर्डात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीतांची प्रकृती लवकरच ठणठणीत व्हावी, विषाणूंचा नायनाट व्हावा आणि परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी मुस्लिम बांधव सर्वत्र दुवा करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.