esakal | हृदयद्रावक : सासुरवाडीतून दुचाकीने तिघे निघाले होते गावी अन् रस्त्याने पिता-पुत्राचा...
sakal

बोलून बातमी शोधा

accident in buldana district.jpeg

शेलसूर येथील अंबादास सुभाष रिंढे (वय 41) हे पत्नी दीपाली (वय 35) व मुलगा कार्तिक (वय 5) हे तिघे सोमवारी (ता. 11) रात्री सासुरवाडी बोरगाव काकडे येथे गेले होते.

हृदयद्रावक : सासुरवाडीतून दुचाकीने तिघे निघाले होते गावी अन् रस्त्याने पिता-पुत्राचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पिता-पुत्राचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. चिखली ते अमडापूर मार्गावरील दहिगाव फाट्यानजीक आज (ता.12) सकाळी 8 वाजेदरम्यान सदर घटना घडली. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, त्यांच्याविरोधात अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेलसूर येथील अंबादास सुभाष रिंढे (वय 41) हे पत्नी दीपाली (वय 35) व मुलगा कार्तिक (वय 5) हे तिघे सोमवारी (ता. 11) रात्री सासुरवाडी बोरगाव काकडे येथे गेले होते. तेथे मुक्काम करुन सकाळी एमएच 28 एम 6300 क्रमांकाच्या दुचाकीने उंद्री येथे जात होते. दरम्यान, दहिगाव फाट्याजवळ एमएच 28 एझेड 3926 क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये अंबादास रिंढे व मुलगा कार्तिक याचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी दीपाली गंभीर जखमी झाली. 

आवश्यक वाचा - कोरोनाने मारले अन् या व्यवसायाने तारले, लाॅकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या शेकडो युवकांना मिळतोय रोजगार

अपघाताची माहिती मिळताच अमडापूर पोलिस ठाणेदार अमित वानखडे यांच्या मार्गदर्शनात एएसआय लक्ष्मण टेकाळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमीवर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

हेही वाचा - धक्कादायक! आता लक्षणं नसतानाही आढळत आहेत कोरोनाचे रुग्ण

मृतक होते शिक्षक
अपघातात मृत्यू झालेले अंबादास रिंढे हे शेलसूर येथील रहिवासी होते. ते तीन वर्षांपासून उंद्री येथील सहकार विद्या मंदिर येथे लिपिक म्हणून कार्यरत होते. यासोबतच ते उंद्री येथे त्यांचे टायपिंग इन्स्टिट्यूट होते. त्यांच्यावर शेलसूर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

loading image