महाराष्ट्र दिन : भूसुरूंग स्फोट अन्‌ पोलिसांच्या शरीरांचे तुकडे-तुकडे, शवविच्छेदन करता आले नाही...

Fifteen people were martyred in a Naxal attack on Maharashtra Day in last year
Fifteen people were martyred in a Naxal attack on Maharashtra Day in last year

गडचिरोली : 30 एप्रिल 2019... एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस... नक्षलवाद्यांनी जांभुळखेड्यात गावात रस्त्यावर काही वाहन जाळले... यामुळे एकच खळबळ उडाली... एक मे 2019 कामगार दिन, महाराष्ट्रदिनी पोलिस या घटनेचा पंचनामा करण्यासाठी जांभुळखेड्याच्या दिशेने निघाले... 15 कर्मचारी एकाच वाहनात बसले... मात्र, नक्षलवाद्यांनी लावेल्या भूसुरूंग स्फोटात वाहनाचे चिंधड्या उड्याला... यात खासगी वाहनचालकासह 15 पोलिस कर्मचारी शहीद झाले... महाराष्ट्रदिनीच अवघ्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या 
या घटनेच्या जखमा आजही गडचिरोली पोलिस दलाच्या हृदयावर ताज्या आहेत... 

मागच्या वर्षी 1 मे रोजी झालेला हा हल्ला मरकेगाव, हत्तीगोटा, लाहेरी या तीन ठिकाणच्या मोठ्या नक्षल हल्ल्याप्रमाणेच होता. नक्षलवाद्यांनी मरकेगाव घटनेत वापरलेला फॉर्म्युला याही घटनेत वापरला. नेमक्‍या महाराष्ट्र दिनाला ही घटना घडवून आणल्याने ही घटना कुणीच विसरू शकणार नाही. पोलिस-नक्षली यांच्यात शह-काटशह सुरूच असतात. एकाच वर्षात मरकेगाव, हत्तीगोटा, लाहेरी प्रकरणे घडवून नक्षलवाद्यांनी आघाडी घेतली होती. परंतु, एप्रिल 2018 मध्ये पोलिसांनी अशी जबरदस्त कारवाई केली की नक्षलवाद्यांच्या तोंडचं पाणी पळालं.

भामरागड तालुक्‍यातील कसनसूर गावाजवळ बोरियाच्या जंगलात ही ऐतिहासिक चकमक घडली होती. ज्यात पोलिसांनी 37 ते 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. पोलिसांच्या नक्षलविरोधी C-60 कमांडोंच्या टीमने केलेल्या कारवाईत नक्षलवाद्यांचे दोन विभागीय समितीचे सदस्यही ठार झाले होते. यात नक्षलवाद्यांचे कंबरडच मोडले होते. ही चळवळ अखेरचा श्‍वास घेत आहे, असं मानले जात होते. 

परंतु, नक्षली जखमी सापाप्रमाणे डूख धरून बसले होते. त्यानी एका वर्षभरात जांभुळखेडा प्रकरण घडवून आणले. हा स्फोट एवढा भयानक होता की शहीद झालेल्या जवानांच्या शरीरांचे तुकडेतुकडे झाले. शवविच्छेदन करण्यासारखी स्थितीही नव्हती. पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत या भूसुरूंग स्फोटाचा मुख्य सूत्रधार दिनकर गोटा व कोरची दलमची महिला नक्षली सुनंदा कोरेटी हिला अटक केली. याशिवाय अन्य चार आरोपी पकडले. या घटनेनंतर पोलिसांनी सावध भूमिका घेताना आपली आक्रमकता मात्र सोडली नाही.

नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणवल्या जाणाऱ्या अबुजमाडच्या डोंगराळ भागात धडक देत कारवाई केली. नक्षल चळवळीतील सर्वोच्च संघटना असलेल्या CPI (Maoist) संघटनेची एकमेव महिला सदस्य असलेल्या नर्मदाक्का हिला पतीसह अटक केली आहे. त्यामुळे पोलिसांचे पारडे जड दिसत असले तरी नक्षल नामक साप कधी फणा काढून चावा घेइल याचा नेम नाही. 

घटना होती नियोजित

महाराष्ट्रदिनी स्फोट घडवून आणण्याचे नक्षलवाद्यांनी पूर्वीच नियोजित केले होते. त्यानुसारच त्यांनी रत्यावर वाहनांची जाळपोळ केली होती. तसेच भूसुरूंग स्फोट लावले होते. पोलिस घटनेचा तपास करण्यासाठी येईल आणि स्फोट घडवून आणू असा त्यांचा प्लान होता. त्यांच्या प्लाननुसार पोलिसांना माहिती मिळातच 15 कर्मचारी एकाच गाडीने तपासासाठी निघाले. पोलिसांची गाडी जांभुळखेडा येथे पोहोचताच नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. यात खासगी वाहनचालकासह 15 पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. 

शरीरांचे झाले ते तुकडे-तुकडे

जांभुळखेडा स्फोटाचा तपास करण्यासाठी पोलिस येणार आहे, पोलिस किती वाजता, कुठल्या मार्गाने येतील याची संपूर्ण माहिती नक्षलवाद्यांना आधीच मिळाली होती. त्यानुसार त्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला होता. हा स्फोट एवढा भयानक होता की शहीद झालेल्या जवानांच्या शरीरांचे तुकडे-तुकडे झाले होते. शवविच्छेदन करण्यासारखी स्थितीही नव्हती.

पोलिसांसमोर आव्हान

कोरोनाचे थैमान सुरू असतानाही नक्षलवाद्यांनी पोलिस खबऱ्या म्हणत तीन निरपराध नागरिकांच्या हत्या केल्या. आता तेंदू हंगामात त्यांच्या कारवायाना जोर चढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आपला एकही जवान न गमावता या नक्षलरूपी सापाचा फणा ठेचण्याचे अवघड आव्हान पोलिसांपुढे आहे. 

जनशक्ती महत्त्वाची

नक्षल्यांविरोधात लढताना पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असली तरी हत्यारांच्या शक्तीसोबत जनशक्ती महत्त्वाची आहे. नक्षलवाद्यांनी आजवर घडविलेल्या हिंसक घटना केवळ त्यांच्या शक्तिशाली गुप्तचर यंत्रणेच्या बळावरच घडवल्या. या यंत्रणेसाठी ते स्थानिक नागरिकांनाच वापरतात. पूर्वी त्यांना लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा असायचा, पण आता तो त्यांना बंदुकीच्या बळावर मिळवावा लागतो. जनप्रेमाचा लंबक आता पोलिसांच्या बाजूने सरकत आहे. मागील काही वर्षांत पोलिसांनी राबविलेल्या जनकल्याणाच्या उपक्रमामुळे हे शक्‍य झाल आहे. परंतु, अजून बरीच मोठी मजल मारावी लागणार आहे. 

ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांना केली गावबंदी

अहेरी तालुक्‍यातील किष्टापूर नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची नासधूस केल्याने संतप्त झालेल्या 16 गावांतील ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांना नुकतीच गावबंदी केली. असा जनक्षोभ पोलिसांना नक्षल्याच्या विरोधात योग्यरीतीने वापरता आला तरच नक्षलवादाची नांगी ठेचली जाईल आणि जनशक्तीसोबत राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com