esakal | पायी जाणाऱ्या मुलावर भुंकला कुत्रा आणि दोन गटांत सुरु झाली प्रचंड हाणामारी.. वाचा काय आहे प्रकार 
sakal

बोलून बातमी शोधा

fight between two groups as dog barked

चंद्रकांत खेडकर, भूषण खेडकर, आशीष देशमुख, राधेश्‍याम भुजबळ, अशी हल्ल्यातील जखमींची नावे आहेत. जखमींना उपचाराकरिता मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पायी जाणाऱ्या मुलावर भुंकला कुत्रा आणि दोन गटांत सुरु झाली प्रचंड हाणामारी.. वाचा काय आहे प्रकार 

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : कोणता वाद कधी पेटेल याचा काहीच नेम राहिला नाही. मोर्शी तालुक्‍यातील खेड गावात कुत्रा भुंकल्यामुळे दोन गटांत वादानंतर हाणामारी झाली. त्यात दोन्ही कुटुंबातील चारजण जखमी झाले. मोर्शी पोलिसांनी परस्परविरुद्ध तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

भावाला पोलिसांनी चोप दिला म्हणून `त्याने’ पोलिसावरच उगारला सूड, काय घडले ते वाचा...

चंद्रकांत खेडकर, भूषण खेडकर, आशीष देशमुख, राधेश्‍याम भुजबळ, अशी हल्ल्यातील जखमींची नावे आहेत. जखमींना उपचाराकरिता मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

छाया चंद्रकांत खेडकर यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आशीष देशमुख, राधेश्‍याम भुजबळ, विवेक देशमुख या तिघांविरुद्ध तर परस्परविरुद्ध बाजूने आशीष देशमुखच्या तक्रारीवरून छाया खेडकर, चंद्रकांत खेडकर व भूषण खेडकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. महिलेने तक्रारीत म्हटले की, आशीष देशमुख याच्या मुलाने घरासमोर येऊन कुत्र्यापुढे भुंकण्याचा आवाज केल्याने चिडलेला कुत्रा त्या मुलाचे अंगावर धावला, त्यावरून संबंधिताने शिवीगाळ व मारहाण केल्याचे म्हटले. 

काय आहे पितृ पंधरवड्याचे महत्त्व? श्राद्धपक्ष म्हणजे नेमके काय? घ्या जाणून

 देशमुख यांच्या तक्रारीत खेडकर याचा कुत्रा मुलाच्या अंगावर चावण्याच्या उद्देशाने धावला, कुत्र्याला बांधण्याचा सल्ला दिला असता मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले.