अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा अखेर स्थगित; सदोष साॅफ्टवेअरचा फटका

finally Amravati University exams postponed
finally Amravati University exams postponed

अमरावती : पहिल्याच दिवशी ऑनलाइन परीक्षेचा पुरता बोजवारा उडाल्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचा निर्णय बुधवारी (ता. २१) सायंकाळी जाहीर केला. नवे वेळापत्रक सर्व अडचणी दूर झाल्यानंतर व नियोजनानंतर जाहीर करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका १ लाख ३५ हजार परीक्षार्थ्यांना बसत आहे. कोरोना संक्रमणामुळे विलंबाने नियोजित परीक्षा दोन वेळा स्थगित करण्याची नामुष्की यापूर्वी विद्यापीठावर आली आहे. त्यानंतर पूर्ण नियोजन झाल्याचा दावा करीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० च्या परीक्षा २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्या होत्या. 

परंतु परीक्षेच्या पहिल्याच दिवशी (ता.२०) सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे दुस-या दिवशीची (ता.२१) परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्या दिवशीचा पेपर ८ नोव्हेंबरला घेण्यात येईल असे परीक्षा विभागाने काल रात्री ८ वाजता जाहीर केले.

परंतु सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचण अद्याप दूर झालेली नसल्यामुळे ४ आणि १५ ऑक्टोंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकातील २२ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याबाबतचे परिपत्रक परीक्षा विभागाने बुधवारी सायंकाळी प्रसिद्ध केले आहे.

उन्हाळी २०२० परीक्षेच्या अनुषंगाने लवकरच पुढील सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाकडे निर्गमित करण्यात येणार असून, २२ ऑक्टोंबर २०२० पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाच्या वतीने स्थगित करण्यात आल्याबाबतची  नोंद सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी घ्यावी, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी विद्यापीठाच्यावतीने कळविले आहे.
 

चार तास काथ्याकूट व स्थगिती

परीक्षांचा उडालेला बोजवारा व पुढील नियोजन यासाठी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत तांत्रिक दोष पूर्ण निस्तारेस्तोवर परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस प्र.कुलगुरू राजेश जयपुरकर यांच्यासह अधिष्ठाते, परीक्षा नियंत्रक, परीक्षा मंडळाचे सदस्य यांची उपस्थिती होती. जवळपास चार तास झालेल्या बैठकीत अखेर स्थगितीचा निर्णय झाला.

संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com