Medical College Mock Drill
sakal
यवतमाळ - रुग्णालयात नेहमीची वर्दळ सुरू होती... कुठे रुग्णांवर उपचार सुरू, कुठे नातेवाईकांची लगबग, तर कुठे डॉक्टर-नर्सेस आपापल्या कामात व्यस्त. अचानक ‘आग लागली!’ अशी सूचना मिळते... आणि काही क्षणांतच सगळ्यांच्या हालचालींना वेग येतो! रुग्णालयातील कर्मचारी सतर्क होतात, सुरक्षा रक्षक धाव घेतात आणि बचावकार्याला सुरुवात होते. मात्र, ही खरी आग नव्हती; वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेण्यात आलेली मॉकड्रिल होती.