esakal | जनावराच्या गोठ्यात आगीचा तांडव; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली
sakal

बोलून बातमी शोधा

Fire in herd of pet animals in amravati district

दिवाळी असल्याने सर्वत्र दिवे लावून व फटाके फोडून हा सण साजरा केला जातो मात्र नागरिकांनी दिवे लावताना व फटाके फोडताना काळजी घेणे देखील आवश्यक आहे. 

जनावराच्या गोठ्यात आगीचा तांडव; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली

sakal_logo
By
प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती):  तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर गावात काल रात्री 9वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली जनावरांच्या गोठ्यात कुटार असलेल्या ठिकाणी अचानक आग लागून काही वेळातच मोठा भडका झाला त्यामुळे जवळ असलेल्या कुटार व ईधन काळी कचरानी पेट घेतला त्यामुळे प्रचंड आगीचा तांडव झाल्याने सर्वची चांगली पळापळ झाली

अधिक वाचा - छंद म्हणून जुळ्या बहिणी करायच्या बेकरी प्रॉडक्ट्स तयार; आयुष्याने यु-टर्न घेतल्याने झाली व्यवसायाला सुरुवात

दिवाळी असल्याने सर्वत्र दिवे लावून व फटाके फोडून हा सण साजरा केला जातो मात्र नागरिकांनी दिवे लावताना व फटाके फोडताना काळजी घेणे देखील आवश्यक आहे. तळेगाव ठाकूर येथील गावाच्या काठावर येथील काही नागरिकांनी जनावरे ठेवण्याकरिता कोठे तयार केले असून त्याठिकाणी जनावरे, लाकूड, काळी, व कुटार ठेवतात.

 मात्र काल अचानक जनावरे असलेल्या ठिकाणी कुटाराला आग लागल्याने मोठा भडका आगीने घेतला त्यामुळे कोठ्यातील कुटार व लाकूड जळून खाक झालेत उपस्थित नागरिकांनी आग लागतच कोठ्यातील जनावरे सोडून आग विझविली.

सविस्तर वाचा - ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू

त्यामुळे मोठी घटना टळली आगीची माहिती मिळताच तिवसा पोलीस व तिवसा नगरपंचायतचे अग्निशामक वाहन घटनास्थळी दाखल झाले होते मात्र तोपर्यंत नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती.

संपादन - अथर्व महांकाळ