esakal | यवतमाळ : पुसदच्या हॉटेलमध्ये आग; जीवितहानी टळली
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमाळ : पुसदच्या हॉटेलमध्ये आग; जीवितहानी टळली

यवतमाळ : पुसदच्या हॉटेलमध्ये आग; जीवितहानी टळली

sakal_logo
By
शशिकांत जामगडे

पुसद (जि. यवतमाळ) : शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक स्थित असलेल्या हॉटेल देहलीवाला याला शनिवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत हॉटेलमधील फर्निचर जळून खाक झाले. ही आग भट्टीजवळील धूर जाणाऱ्या चिमणीमधील अंगारामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुसद नगरपालिकेचे अग्निबंब ताबडतोब घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. हॉटेलमध्ये ५ ते ६ गॅस सिलिंडर होते. आगीत सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्दैवी घटना घडली असती. पुसदचे तहसीलदार डाॅ. राजेश चव्हाण हे बाहेरगावी असल्याने त्यांनी तलाठ्यांकडून माहिती घेतली. पुरवठा विभागाकडून अधिकाऱ्यांनी हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरचा वापर होतो की नाही? होत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, सुरक्षेसंबंधी उपाययोजना आहेत किंवा नाही याची खातरजमा करावी जेणेकरून शहरात दुर्घटना होऊन मनुष्यहानी होणार नाही.

हेही वाचा: रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर

शहरातील हॉटेल्सचा सर्व्हे करून अशा आपत्तीकालीन वेळी हॉटेलमध्ये अग्निबंब आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात येणार आहे. तसेच हॉटेल चालकांकडे अग्नीबंबाबत नोटीस बजावून त्वरित उपलब्ध करून घ्यावे असे सांगितले जाईल. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाकडून पूर्व खबरदारी घेतली जावी, असे पुसद नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड म्हणाले.

loading image
go to top