नागपूर-छिंदवाडादरम्यान धावली पहिली मालगाडी, शेतकऱ्यांना लाभ 

योगेश बरवड
Tuesday, 20 October 2020

नागपूर-छिंदवाडा नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण झाल्यानंतर छिंदवाडा येथून भंडारकुंड तसेच इतवारी ते केळवद व केळवद ते भिमालगोंदीपर्यंत रेल्वेचे परिचालन यापूर्वीच सुरू झाले आहे.

नागपूर  ः बहुप्रतीक्षित नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज प्रकल्प पूर्णत्वास आला असून व्यावसायिक वापरही सुरू झाला आहे. अलीकडेच या मार्गवरून पहिली मालगाडी धावली. या सेवेमुळे दोन्ही राज्यांमधील शेतकरी व व्यावसयिकांना लाभ मिळणार आहे. मालगाडीच्या यशस्वी फेरीमुळे नवीन वर्षात या मार्गावरू प्रवासी रेल्वे चालविले जाण्याचेही संकेत मिळाले आहे.

नागपूर-छिंदवाडा नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण झाल्यानंतर छिंदवाडा येथून भंडारकुंड तसेच इतवारी ते केळवद व केळवद ते भिमालगोंदीपर्यंत रेल्वेचे परिचालन यापूर्वीच सुरू झाले आहे. भंडारकुंड ते भीमलगोंदी दरम्यान काम पूर्ण होताच २२ ऑगस्टला सीआरएसने निरीक्षण करून मालगाडी चालविण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार किरकोळ उणिवा दूर करण्यात सुमारे दीड महिन्यांचा कालावधी लागला.

अधिक माहितीसाठी - Video : हृदयाला फुटले पाझर; जेव्हा विधवा म्हणाली, ‘घरचा कर्ता पुरुष गेल्यावर जगायच कसं’
 

यापूर्वी नागपूर ते छिंदवाडा जाणाऱ्या मालगाड्या आमलामार्गे सोडण्यात येत होत्या. त्यामुळे मालगाड्यांना १३० किमीचा लांब फेरा पडत होता. आता इतवारी ते छिंदवाडा थेट मालगाडी चालविण्यात आली. मका उत्पादनात छिंदवाडा देशात प्रथम क्रमांकावर मानला जातो. सोबतच सीताफळाचेही उत्पादन होत असल्याने ब्रँडिंगही छिंदवाडा येथूनच झाले आहे. आता मालगाडी सुरू झाल्याने मका व सीताफळाची रॅक नागपूरमार्गे दक्षिण भारतात थेट पोहोचू शकणार आहे. 

संपादित - अतुल मांगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first Commercial train to run between Nagpur-Chhindwara