विदर्भातील याही जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; बाधित व्यक्ती दिल्लीच्या कार्यक्रमात होता सहभागी

coronavirus-4923544_960_720.jpg
coronavirus-4923544_960_720.jpg

वाशीम : संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्यामध्ये वाशीम जिल्ह्यात मात्र अजून एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आज (ता.3) जिल्ह्यातील एका व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल सकारात्मक आला असून, याची प्रशासनाने पुष्टी केली आहे. बाधित व्यक्ती हा मेडशी येथील असल्याची माहिती असून, तो दिल्ली येथील तबलिगीच्या धार्मिक संमेलनात सहभागी झाला होता.

संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये मात्र अजून एकही व्यक्ती पाॅझिटीव्ह आढळली नव्हती. मात्र, दोन आठवड्यापूर्वी दिल्ली येथील तबलिगीच्या धार्मिक कार्यक्रमात हा व्यक्ती सहभागी झाला होता. राज्यातील 109 भाविकांमध्ये याचा सहभाग होता. या संमेलनात हजेरी लावून तो परत आल्याचा संशय जिल्हा प्रशासनाला आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधीत संशयीतास विचारणा केली असता, तो त्या संमेलनास गेला नसल्याचे सांगत होता. 

तरीही त्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्याच्या घशातील लाळेचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज (ता.3) त्याच्या लाळेच्या तपासणीचा वैद्यकीय अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राप्त झाला असून, त्यास कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनानेही या बाबीची पुष्टी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com