esakal | बोंबला! एका चुकीमुळे 78 वर्षीय महिलेच्या अंत्यसंस्काराला जमले 50 लोकं, वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

The first victim of corona in Daryapur taluka of Amravati district

विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या मृत्यूबाबत दर्यापूर प्रशासनाला उशिरा कळले. तोपोर्यंत महिलेल्या अंत्यसंस्काराला 50 लोक गोळा झाले होते. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. अकोला प्रशासनाने तातडीने याबाबत दर्यापूर प्रशासनाला माहिती दिली असती तर अंत

बोंबला! एका चुकीमुळे 78 वर्षीय महिलेच्या अंत्यसंस्काराला जमले 50 लोकं, वाचा...

sakal_logo
By
शशांक देशपांडे

दर्यापूर (जि. अमरावती) : तालुक्‍यातील टाकळी येथील सत्तर वर्षीय महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू असताना श्‍वसनाचा त्रास झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत महिलेस रुग्णवाहिकेने टाकळी ग्रामात आणले. तिच्या अंत्यसंस्काराला जवळपास 50 ते 60 लोक सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. 

तालुक्‍यातील टाकळी येथील सत्तर वर्षीय महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्‍टरांनी त्यांची कोरोना चाचणी केली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर कोरोना वॉर्डात उपचार सुरू होता. उपचारादरम्यान त्यांना श्‍वसनाचा त्रास झाल्याने मृत्यू झाला.

क्लिक करा - आजवर जिने राखी बांधली तीच उठली जीवावर, अन्‌ घडली ही भयंकर घटना...

विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या मृत्यूबाबत दर्यापूर प्रशासनाला उशिरा कळले. तोपोर्यंत महिलेल्या अंत्यसंस्काराला 50 लोक गोळा झाले होते. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. अकोला प्रशासनाने तातडीने याबाबत दर्यापूर प्रशासनाला माहिती दिली असती तर अंत्यसंस्काराला उपस्थित होण्यापासून नागरिकांना रोखता आले असते. मात्र, तसे न झाल्याने आता अंत्यसंस्कारात उपस्थित लोकांचा शोध घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. 

दर्यापूर तालुक्‍यात पहिला बळी

दर्यापूर तालुक्‍यात आतापर्यंत एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नांदरून, चंडीकापूर, टाकळी, शिंगणापूर, बाभळी, पंजाबराव कॉलनी या भागातील रुग्णांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल केले आहेत. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 54 लोकांना कॉरंटाईन करण्यात आले आहेत. अशात महिलेच्या मृत्यूने तालुक्‍यातील पहिला बळी ठरला आहे.

जाणून घ्या - बिअर बार चालकांसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या नव्या सूचना जाहीर, वाचा...

प्रशासनावर आली नागरिकांना शोधण्याची वेळ

कोरोनाचा संसर्ग होऊन 78 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. मात्र, अकोला प्रशासनाने तातडीने याबाबत दर्यापूर प्रशासनाला माहिती दिली नाही. यामुळे अंत्यसंस्काराला नागरिकांनी गर्दी केली. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने पूर्ण खबरदारी घेत अंत्यसंस्कार होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता गावातील लोक अंत्यसंस्कारात सहभागी झाले. आता त्या सर्वांचा शोध घेऊन कॉरंटाईन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. 

कोरोनाचे 24 नवे रुग्ण

अमरावती जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. रविवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 24 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 879 झाली आहे. शनिवारी एकाच दिवशी 60 कोरोनाबाधित आढळून आले होते. 

संपादन - नीलेश डाखोरे