राजस्थानातील ‘मोस्ट वॉन्टेड’ पाच गुन्हेगारांना वाशीममधून अटक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

वाशीम पोलिसांनी एपीआय अतुल मोहनकर व पोलिस उपनिरीक्षक भगवान पायघन यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार केली. शहरातील महालक्ष्मी पेट्रोपंपामागे काही इसम गेल्या अनेक दिवसांपासून राहत असल्याच्या माहितीवरून याठिकाणी छापा टाकला.

वाशीम : खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेले व राजस्थान सरकारने बक्षीस जाहीर केलेल्या कुख्यात आरोपींना जेरबंद करत दोन पिस्तूल जप्त केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व राजस्थान पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर खुनासारखे गंभीर गुन्हे नोंद असून राजस्थान सरकारने या आरोपींवर बक्षीस जाहीर केले होते.

राजस्थानमधील कोटा शहरातील आरोपी अमानबच्चा व त्याच्या साथीदारांनी एका इसमाचा गोळी झाडून हत्त्या केली. त्यानंतर ते फरार झाले होते. या आरोपींवर राजस्थान सरकारने बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी वाशीम शहर गाठून जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांना प्रकरणाची माहिती दिली. यारून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - #Republic day 2020 : तिरंग्याच्या खाली एकवटण्याची गरज : बच्चू कडू

आरोपींजवळ दोन पिस्तूल व जिवंत काडतुसे
वाशीम पोलिसांनी एपीआय अतुल मोहनकर व पोलिस उपनिरीक्षक भगवान पायघन यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार केली. शहरातील महालक्ष्मी पेट्रोपंपामागे काही इसम गेल्या अनेक दिवसांपासून राहत असल्याच्या माहितीवरून याठिकाणी छापा टाकला असता या छाप्यात अमनअली एहेसान अली, गोलू उर्फ जावेद हुसेन, मो. इसरद शब्बीर खान, मो. सलिम मो. सोफी, मो. उमर मो. चांद या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या झडती दरम्यान दोन पिस्तूल व जिवत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.

महत्त्वाची बातमी - बच्चू कडू इन ॲक्शन, अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका

पोलिसांचा सिनेस्टाईल छापा
या प्रकरणातील आरोपी कुख्यात असल्याने दोन पथके तयार करण्यात आली होती. या दर्गावर छापा टाकण्याआधी पोलिसांनी बाजूला चालत असलेल्या वरली मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकण्याचा बनाव केला होता. नंतर अतुल मोहनकर यांच्या पथकाने पश्‍चिमेकडून तर भगवान पायघन यांच्या पथकाने दक्षिणेकडून नंदकुले याच्या पथकाने उत्तरेकडून तर बाबूलाल मिना यांच्या पथकाने पूर्वेकडून सापळा लावला होता. सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड व पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एकाच वेळी 28 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five most wanted criminals arrested in washim from rajasthan