esakal | तिथे आढळल्या त्याच्या पाऊलखुणा... गाव दहशतीत
sakal

बोलून बातमी शोधा

The footprint of a tiger was seen in the village of Chandrapur district

किरमीरी मार्गावरही अनेक ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. शेतात ये जा करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना वाघोबाने दर्शनही दिले. कोरोनाच्या सावटात गावकऱ्यांनी स्वत:ला कुलूप बंद केले.

तिथे आढळल्या त्याच्या पाऊलखुणा... गाव दहशतीत

sakal_logo
By
नीलेश झाडे

धाबा (जि. चंद्रपूर) : सध्या जगात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातला आहे. चिनमधून आलेल्या व्हायरसने देशाला आपल्या कवेत घेतले आहे. कोरोना व्हायरसचे सर्वाधिक बळी इटलीत झाले आहेत. भारतातही कोरोना आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊन लागू केले आहे. यामुळे सर्वांना घरातच राहावे लागत आहे. कोरोनाची भीती नागरिकांच्या मनात असतानाच भलताच प्रकार या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका... तालुक्‍यातील हिवरा गावातील नागरिक कोरोनाच्या भीतीपोटी घरातच लॉकडाऊन झाले आहेत. घराच्या बाहेर जाणेसुद्धा गावकऱ्यांनी टाळले आहे. मात्र, शेतात उभी असलेली पिके बघण्यासाठी बळीराजाचे शेतात ये जा सुरू आहेत. मात्र, शेतात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. गावात कोरोनाची तर शेतात वाघोबाची दहशत अशीच स्थिती ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात टाळेबंद आहे. खेड्यातही कोरोनाची भीती दिसून येत आहेत. आता या भीतीत वाघोबाने भर घातली आहे. गोंडपिपरी तालुक्‍यात येणाऱ्या हिवरा गावालगत वाघ दिसत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावापासून जवळच असलेल्या विलास कुत्तमारे यांच्या शेतात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत.

कसं काय बुवा? - लॉकडाउनमुळे माहेरीच अडकली विवाहिता, प्रियकराने हितगुज साधण्याचा प्रयत्न केला अन्‌ कुटुंबीयांनी केले असे...

किरमीरी मार्गावरही अनेक ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. शेतात ये जा करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना वाघोबाने दर्शनही दिले. कोरोनाच्या सावटात गावकऱ्यांनी स्वत:ला कुलूप बंद केले. मात्र, शेतात उभे असलेले पिक बघायला बळीराजाची शेतात ये जा सुरू आहे. अश्‍यात वाघोबाने शेतशिवारात आसरा घेतल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान गावकऱ्यांनी वनविभागाला पगमार्गाची माहिती दिली. वनरक्षक धनराज रायपुरे,गोविंदा गेडाम यांनी पगमार्गाची पाहणी केली. 

loading image