
टीकटॉक गर्ल पूजा चव्हाण हिने ८ तारखेला आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येत संजय राठोड यांच्या सहभाग असल्याचे बोलले जात होते. पुजाशी नाव जोडल्यापासून राठोड दिसेनासे झाले. त्यांचा अद्याप पत्ता नाही.
मानोरा (जि. वाशीम) : वनमंत्री संजय राठोड मंगळवारी (ता. २३) सहपरिवार पोहरादेवी येथे दर्शनासाठी येणार आहेत. ही माहिती पोहरादेवी संस्थानचे धर्मपीठाधीश बाबूसिंग महाराज यांनी शनिवारी पोहरादेवी येथे पार पडलेल्या बैठकीत दिली.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणापासून वनमंत्री संजय राठोड हे विवादात सापडले आहे. ते कोणाच्याही संपर्कात नसल्याचे जनमानसात बोलले जात आहे. त्यांचा मोबाईलसुद्धा ‘नॉटरिचेबल’ असल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. यामुळे वनमंत्र्यांसह बंजारा समाजाचीसुद्धा बदनामी होत आहे. त्यामुळे मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे दर्शनासाठी यावे, असे आवाहन तेथील महंतांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केले होते.
त्यानुसार वनमंत्री राठोड २३ तारखेला, मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता परिवारास उपस्थित राहतील. त्यानंतर ते संत सेवालाल महाराज, संत डॉ. रामराव महाराज, जगदंबा माता, बाबनलाल महाराज यांचा आशीर्वाद घेऊन मत व्यक्त करतील, अशी माहिती धर्मपीठाधीश बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज यांनी शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीत दिली.
अधिक माहितीसाठी - नागरिकांनो! सोन स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?
टीकटॉक गर्ल पूजा चव्हाण हिने ८ तारखेला आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येत संजय राठोड यांच्या सहभाग असल्याचे बोलले जात होते. पुजाशी नाव जोडल्यापासून राठोड दिसेनासे झाले. त्यांचा अद्याप पत्ता नाही. यामुळे आणखीनच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ते पोहरादेवी येथे दर्शनासाठी येणार असे अनेकदा बोलले गेले. मात्र, ते आले नाही. आता पुन्हा ते येणार असल्याचे बोलले जात आहे. संजय राठोड येणार की नाही याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.