पुन्हा चाळीस तासांचे लॉकडाउन; अत्यावश्‍यक सेवा राहणार सुरू

Forty hour lockdown again Essential services will continue yavatmal corona news
Forty hour lockdown again Essential services will continue yavatmal corona news

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. यात शनिवार (ता. सहा) सायंकाळी पाच ते सोमवार (ता. आठ) सकाळी नऊपर्यंत चाळीस तासांचे ‘वीक ॲण्ड’ लॉकडाउन लागू केले आहे. याकाळात दूध, पेट्रोल, गॅस, औषधी, रुग्णालय आदी अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहे. यवतमाळ शहरात शंभरच्यावर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. पुसद शहरात वाढते रुग्ण पाहता याभागात बाजारपेठेच्या वेळा बारावाजेपर्यंत ठेवण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी निर्बंध अधिक कडक केले आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी बाजारपेठेच्या वेळा कमी केल्या होत्या. पाच दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत करण्यात आल्या होत्या. या आदेशात वाढ करून आठ मार्चपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

त्यानुसार रविवारी दिवसभर जिल्ह्यातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद असणार आहे. शनिवारपासून ४० तासांची संचारबंदी लागू होणार आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शनिवार सायंकाळी पाच वाजतापासून सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी घोषित केली आहे. 

यांना मुभा

  • अंतर्गत दूध व दुग्धजन्य पदार्थ दूध विक्रेते/डेअरी
  • जिल्ह्यातील सर्व दवाखाने
  • सर्व औषधी दुकाने
  • जनावरांचे दवाखाने व औषधी दुकानासह
  • पेट्रोल पंप
  • गॅस वितरण

पाच वाजताच गर्दी

आठ मार्चपर्यंत संचारबंदी असल्याने बाजारपेठ पाच वाजता बंद होते. याच वेळी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अखेरच्या क्षणी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडतो. दिवसभर घरी राहून बाजारपेठ बंद व्हायच्या वेळीच बाहेर येऊन नागरिक काय साध्य करतात, असाही प्रश्‍न निर्माण केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com