Yavatmal : ऑनलाइन खरेदीतून फसवणुकीचा धोका

दिवाळीचा उत्साह ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा
Online Shopping Fraud
Online Shopping Fraudsakal
Summary

दिवाळीचा उत्साह ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा

यवतमाळ : दिवाळीचा सण तोंडावर आला असून, अनेक लोक खरेदीचा बेत आखत आहेत. ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळे फेकणे सुरू झाले आहे. ऑफरच्या नावाखाली एखादी लिंक ओपन केल्यास एका झटक्यात बँक खाते खाली होऊ शकते.

त्यामुळे ऑनलाइन खरेदीतून फसवणुकीचा धोका टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याचे फॅड वाढत आहे. बाजारपेठेत जाण्यापेक्षा एका क्लिकवर मिळणाऱ्या वस्तूंवर ग्राहक भाळत आहेत.

ग्राहकांच्या या मानसिकतेचा फायदा ऑनलाइन फ्रॉडर्सकडून घेतला जात आहे. सध्या खरेदीसाठी आकर्षित केले जात आहे. ग्राहकांभोवती ऑफरचे जाळे दिवाळीच्या तोंडावर फेकले जाणार आहे. मोबाईलवर आलेली लिंक ओपन केल्यास चक्क आपल्या खात्यात असलेले पैसे अवघ्या काही मिनिटांत उडवले जाऊ शकते. अशी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी कोणत्याही लिंकवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

स्थानिक व्यावसायिक संकटात

ऑनलाइन खरेदीचे व्यवहार वाढत असल्याने स्थानिक लहान, मोठे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. सणोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर व्यावसायिक लाखो रुपयांच्या माल दुकानात भरतात. मात्र, ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद बाजारपेठेत दिसत नाही. हा स्थानिक व्यावसायिकांचा अनुभव आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com